धाराशिव / प्रतिनिधी-

 सेवाजेष्ठतेनुसार पात्र असलेल्या महसूल सहाय्यकांची अव्वल कारकूनपदी पदोन्नती दिल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांचा धाराशिव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने डॉ ओंबासे यांचा दि.८ मे रोजी सत्कार करण्यात आला.

 जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सेवाजेष्ठतेनुसार पात्र असलेल्या ७ महसूल सहाय्यकांची अव्वल कारकूनपदी दि.३ मे रोजी पदोन्नती दिली आहे. याबद्दल धाराशिव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. ओंबासे व निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांचा सत्कार करण्यात आला.  ही पदोन्नती प्रक्रिया करण्यासाठी धाराशिव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नितेश काळे, उपाध्यक्ष श्रीकांत अंधारे, सचिव शुभम काळे यांनी विशेष प्रयत्न केले. ‌ यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, सीमा वाघमारे, उषा अकोसकर, शितल माजलगावकर, कल्पना काशीद, विद्या रणदिवे व वर्षा शितोळे आदी उपस्थित होते.


 
Top