तुळजापूर / प्रतिनिधी-
तालुक्यातील वडगाव (लाख ) किराणा दुकानास आगलावल्याने यात दुकानातील ९० हजाराचा माल जळुन खाक झाल्याची घटना बुधवार दि.१०रोजी दुपारी ३.३०वा घडली.
तुळजापूर तालुक्यातील वडगाव (लाख ) येथे श्रीमंत संभाजी करंडे किराणा दुकान असुन त्याचा नातु राहुल करंडे याने त्यांना पैसे देत नसल्याचा कारणावरुन शिवीगाळ केली नंतर गावात गेले असता त्याच्या पत्नीस शिवागाळ करुन दुकानास आग लावल्याने किराणा दुकान जळुन खाक होवून जवळपास ९० हजाराचे नुकसान झाली .
या प्रकरणी पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद यांच्या आदेशावरून श्रीमंत संभाजी करंडे यांच्या फिर्यादीवरून कलम राहुल करंडे यांच्यावर भादंवी ४३६,५०४ गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण पवार करीत आहेत.