तेर / प्रतिनिधी-
धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठ मधील विद्यार्थ्यांनी एमटीएस शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले विशेष म्हणजे शाळेतील चार विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत पहिल्या तीस मध्ये आहेत .
फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेल्या एमटीएस शिष्यवृत्ती परीक्षेत तेर ता. धाराशिव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठ मधील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रासह गुणवत्तेच्या बाबतीतही आपला दबदबा कायम ठेवत एमटीएस शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे .यामध्ये ढोबळे आराध्या अशोक १५० पैकी १२२ गुण मिळवत राज्य गुणवत्ता यादीत १५ वा क्रमांक पटकाविला आहे तसेच कचरे स्वरा प्रदीप १२० गुण मिळवत राज्यात १६ वी , कानडे वेदिका तिरुपती १०६ गुण घेऊन राज्यात २३ वी तर पांढरे आराध्या गणेश १०० गुण मिळवत राज्यात 26 वा क्रमांक पटकाविला आहे .यावेळी या यशस्वी विद्यार्थ्यांना शकुंतला पांचाळ यांचे मार्गदर्शन लाभले .यावेळी मुख्याध्यापक गणपती यरकळ, सहशिक्षक गोरोबा पाडुळे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांसह मार्गदर्शकांचे अभिनंदन केले .