धाराशिव / प्रतिनिधी-

 पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी लिंबराज डुकरे यांची तर सचिवपदी संतोष वतने यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती धाराशिव - २०२३ ची कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली असून कार्याध्यक्षपदी राजपाल दुधभाते व गणेश एडके यांची तर उपाध्यक्षपदी गणेश सोनटक्के व लक्ष्मण दुधभाते तसेच सहसचिवपदी समाधान पडुळकर यांची व कोषाध्यक्षपदी अरविंद ढेकणे तर प्रसिध्दी प्रमुखपदी नितीन डुकरे व नारायण चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.


 
Top