धाराशिव / प्रतिनिधी-

 मान्सून पूर्व तयारीचा आढावा घेतांना या कालावधीत अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला आळा घालण्यासाठी प्रत्येक विभागाची जबाबदारी महत्वाची आहे. मान्सून कालावधीतील संभाव्य धोका लक्षात घेता सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करावे,आपत्तीच्या काळात कर्तव्यात कसूर केल्याचे किंवा आपल्या कामाची जबाबदारी पार पाडण्यास कुचराई केल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्माचा-यांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 2005 नुसार कार्यवाही करण्यात येईल अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले.

 जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सून पुर्व परिस्थितीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली होती, या बैठकीला, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेल्लोरे, महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री.गुज्जर, जिल्हा उपनिबंधक सुनिल शिरापूरकर विविध विभागाचे अधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होते.

 निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी म्हणाले, मान्सून पुर्व कालावधीत सर्व विभागांनी नैसर्गिक आपत्तीचे नियोजन करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात नदीकाठावरील गावे पूर परिस्थितीने बाधित होतात व पूराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील गावांचा संपर्क तुटतो या गावांमध्ये संभाव्य पूर परिस्थतीमध्ये नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी जागा शोधून ठेवाव्यात. उंच जागा, पर्यायी मार्ग, राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था व औषध साठा उपलब्ध ठेवावा. यासाठी उपविभागीय अधिकारी यांनी गावांना भेट देवून पाहणी करावी. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधोपचार व्हावा यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करावे. पावसाळ्यापुर्वी नगरपरिषद, नगरपंचायत व ग्रामपंचायतीने आपल्या क्षेत्रातील नाले, नाली साफसफाईची कामे करावी. सोबतच पिण्याच्या पाण्याचे निर्जंतूकीकरण करावे.

 पोलीस विभागाने जिर्ण पुलावर बॅरीकेटींग करणे व वाहतुकीला आळा घाण्याबाबत तसेच प्रत्येक तलावाच्या ठिकाणी 10 पोलीस कर्मचा-यांची नियुक्ती करावी जेणे करून आपत्तीच्या काळात आपत्ती बचाव कार्य करणे सोयीचे होईल.माकणी धरणाच्या ठिकाणी यात्रा भरते,यावेळी जनसमुदाय मोठया प्रमाणात असतो आणि सदर यात्रा पावसाळ्यात असल्याने आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवावे, विद्युत विभागाने मान्सून पुर्व कामे करुन घ्यावे तसेच धरणात पाणी वाढत असल्यास किंवा पाणी सोडायचे असल्यास लोड शेडिंग करू नये , आरोग्य विभागाने औषध साठा उपलब्ध करुन देण्याबाबत, पुरवठा विभागाने पूर परिस्थितीत बाधित होणाऱ्या गावांकरीता आगाऊ धान्य वितरणाबाबत नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.


 
Top