धाराशिव / प्रतिनिधी-

 जिल्ह्यात आतापर्यंत 10 हजार 903 पशुपालक शेतकऱ्यांनी खेळत्या भांडवलासाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी बहुतांश अर्जदार यांचे सिबील स्कोअर कमी तसेच थकीत कर्जाची परतफेड न केलेले अर्ज बँकाद्वारे नाकारले जात आहेत. तसेच परिपूर्ण नसलेले अर्ज नाकारण्यात येत आहेत.

  पशुपालकांना किरकोळ खर्च भागविण्यासाठी या कार्डच्या माध्यमातून अल्प व्याजदरात 1 लाख 60 हजारांपर्यंत खेळते भांडवल मिळते. ही मोहिम दि.01 मे 2023 ते दि.31 मार्च 2024 या कालावधीत राबविण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील जास्तीत जास्त पशुपालकानी या किसान क्रेडिट कार्डचा लाभ घ्यावा, तसेच अर्जदारांनी आपले अर्ज परिपूर्ण स्वरूपात भरुन अर्ज आपल्या नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत आपल्या दत्तक ग्राम असलेल्या बँक शाखेत जमा करावेत. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.यतीन पुजारी यांनी केले आहे.


 
Top