नळदुर्ग (तानाजी जाधव) :- वागदरी ता.तुळजापूर येथील सामान्य शेतकरी प्रकाश लक्ष्मण बिराजदार यांची कन्या राधिका प्रकाश बिराजदार ह्या घाटकोपर मुंबई येथे नुकतेच झालेल्या रेल्वे पोलीस भरतीत महिला रेल्वे पोलीस म्हणून भरती झाल्या बद्दल वागदरी ता.तुळजापूर येथे ग्राम पंचात व समस्थ ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील राधिका  प्रकाश बिराजदार यांनी जिद्दीने पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नोकरीच्या शोधात आसतानाच एकमहिन्या पुर्वीच ती बाहुल्यावर चढली होती. विवाह झाला तरी त्यांनी नोकरीचा प्रयत्न सोडला नाही.नुकतेच घाटकोपर मुंबई येथे झालेल्या रेल्वे पोलीस भरती प्रक्रियेत तिने सहभाग घेतला आणि महिला रेल्वे पोलीस म्हणून त्यांची निवड झाली.राधिका प्रकाश बिराजदार ह्या वागदरी सारख्या दुर्गम भागातील छोट्या गावातून महिला रेल्वे पोलीस म्हणून केंद्र शासनाच्या रेल्वे पोलीस सेवेत दाखल होणार्‍या पहिल्या महिला आहेत. त्याबद्दल वागदरी ग्रामपंचायत व समस्थ ग्रामस्थांच्या वतीने ग्रा.प.सदस्य सुरेखा भालचंद्र यादव यांच्या हस्ते व उपसरपंच मीनाक्षी महादेव बिराजदार, ग्रा.प.सदस्य मुक्ताबाई विलास बिराजदार, गुनाबाई श्रीरंग बनसोडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत यथोचित सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जेष्ठ कार्यकर्ते तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजी मिटकर गुरुजी,माजी उपसरपंच दत्ता सुरवसे यांची शुभेच्छा पर भाषणे झाली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन एस.के.गायकवाड यांनी केले. यावेळी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष फत्तेसिंगभाई ठाकुर, ह.भ.प.राजकुमार पाटील, ग्रा.प.सदस्य ज्ञानेश्वर पाटील, अमोल पवार, शालेय व्यवस्थापण समिती अध्यक्ष रामसिंग परिहार,सदन शेतकरी अनिल गोगावे,बालाजी बिराजदार,भालचंद्र यादव,अनिल वाघमारे, दिपक धुमाळ,उमेदच्या सिआरपी विद्या बिराजदार,गीताबाई झेंडारे सह महिला,ग्रामस्थ,युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

अजय सोनकांबळे ची पण निवड

नळदुर्ग  : देवसिंगा (नळ) येथील अजय संजय सोनकांबळे हा एकाचवेळी मुंबई शहर पोलिस व मुंबई शहर चालक पोलिस अशाप्रकारे दोन ठिकाणी भरती झाला आहे. देवसिंगा (नळ) गावांतील अजय संजय सोनकांबळे याने गावातील पहिला पोलिस होण्याचा मान मिळविला आहे याबद्दल त्याचे सर्वस्तरांतुन कौतुक होत आहे. कठोर परिश्रम, जिद्द व चिकाटी याच्या बळावर देवसिंगा (नळ) येथील अजय संजय सोनकांबळे याने मुंबई शहर पोलिस व मुंबई शहर चालक पोलिस अशा दोन्ही ठिकाणी एकाचवेळी भरती होण्याचा मान मिळविला आहे. अजय संजय सोनकांबळे हा देवसिंगा (नळ) गावचा पहिला पोलिस झाला आहे. सध्या शासकीय नोकरी मिळणे मुश्किलीचे झाले आहे. प्रचंड मोठया प्रमाणात स्पर्धा सुरू झाली आहे.नोकर्‍या मिळत नसल्याने आज बेरोजगार युवकांची संख्या भरमसाठ वाढली आहे. शिक्षण घेऊनही नोकर्‍या मिळत नसल्याने युवकांमध्ये नाराजी पसरली आहे. मात्र  कठोर परिश्रम व मेहनत घेतली तर नोकरी मिळु शकते हे देवसिंगा (नळ) येथील अजय संजय सोनकांबळे याने दाखवुन दिले आहे. अजय संजय सोनकांबळे याने एकाचवेळी मुंबई शहर पोलिस व मुंबई शहर चालक पोलिस या दोन्ही ठिकाणी भरती होण्याचा मान मिळविला आहे. अजय सोनकांबळे याने मिळविलेल्या या यशाचे आजच्या युवकांनी आदर्श घेण्यासारखा आहे. अजय सोनकांबळे याने मिळविलेल्या या यशाचे सर्व स्तरांतुन कौतुक होत आहे. माजी जि. प.सदस्य राजहमद पठाण यांच्यासह ग्रामस्थांनी सत्कार करून अजय सोनकांबळे याचा गौरव केला आहे.

 
Top