धाराशिव / प्रतिनिधी














 केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) नवी दिल्ली यांच्या वतीने मार्च /एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आलेल्या 10 वी परीक्षेचा निकाल शुक्रवारी दि. 12 मे रोजी ऑनलाईन जाहीर झाला आहे. त्यामध्ये धाराशिव शहरातील तेरणा पब्लिक स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शाळेने यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. शाळा स्थापनेपासून शाळेचा 100 टक्के निकाल लागत आहे.            

शाळेतील श्रेया अमलपुरे या विद्यार्थीनीने 96 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आली आहे. आलोक कासट याने 94.20 टक्के घेऊन द्वितीय, आर्यन बागल व पद्मनाभ ढेंगळे यांनी 94.00 गुण घेऊन तृतीय आले आहेत. श्रुष्टी शिंदे 92.00 टक्के, राजनंदिनी मुलगीर 91.20  टक्के, शुभम साळूंके 91.20 टक्के, उज्वल वारे 91.00 टक्के, श्रेयश नावडे 91.00 टक्के, सत्यजित पाटील 91.00 टक्के, मयुरेश कुलकर्णी 90.00 टक्के, नम्रता मुंढे 90.00 टक्के, अजिंक्य शिंदे, अभय अवचार, वैष्णवी कामे यांनी 90 टक्के गुण मिळवत यश संपादन केले आहे. शाळेची अन्य 26 मुले 80 टक्केपेक्षा जास्त गुण मिळवत यशस्वी झाली आहेत.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष एल. एल. पाटील, सचिव अनंतराव उंबरे, संचालक मंडळ, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

 
Top