धाराशिव/प्रतिनिधी-
शहरात शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास अवकाळी पाऊस कोसळा. मध्यम स्वरूपाच्या पावसाने उकाडा, व उष्णतेपासुन नागरीकांना चांगलास दिलासा मिळाला. पावसामुळे शहराचा विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.
शहरात शनीवारी दुपारी साडेचारच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. सकाळी जोरदार वारा सुटला होता तर दिवसभर ढगाळ वातावरण होते. पावसाळा दुपारी साडेचारच्या सुमारास सुरूवात झाली. मध्यम स्वरूपाच्या पावसात अचानकपणे विद्युत पुरवठा खंडीत झाला. मात्र महावितरणच्या कर्मचारी, अधिकारी यांनी दिर्घ वेळेनंतर विद्युत पुरवठा सुरळीत केला. मात्र शहराच्या काळामारूती परीसरासह उत्तर भागात रात्री नऊ पर्यंत विद्युत पुरवठा बंद राहील्याने नागरीकांची विजे अभावी मोठी पंचाईत झाली. पावसामुळे उष्णतेच्या काहीली पासुन नागरीकांची सुटका झाली. सायंकाळी साडेसात नंतर पाऊस थांबला. पावसामुळे शहरातील खड्डेमय रस्त्यात पाणी साचले होते.
कळंब तालुक्याच्या शिराढोण परीसरातील हंगणगांव, दाभा, काळे सावरगाव, लोहटा या मांजरा धरण परिसरात शनिवारी तुफान गारपीटीने प्रचंड नुकसान झाले आहे. या गारा एवढ्या मोठ्या होत्या की, तब्बल १८ तासानंतर सुद्धा त्या काही प्रमाणात तशाच होत्या. पत्र्याला भोकं पडली तर जनावराची कातडी सोलली आहे.