धाराशिव / प्रतिनिधी- :-

) राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी धाराशिव च्या वतीने  आदित्य गोरे युवक प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार व राज्य सरकार यांची चाल ढकल कामे व आश्वासनांचे एप्रिल फुल आंदोलन करण्यात आलं.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  केक कापून हटके प्रकारे आंदोलन करण्यात आले. केक कापून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला केक खाऊ घालून  एप्रिल फुल च्या घोषणा देऊन आंदोलन करण्यात आलं.

केंद्र सरकार सत्तेत येण्यापूर्वी काळा पैसा भारतात आणू, प्रत्येक भारतीयांच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करू, देशातील तरुणांना रोजगार देऊ, महागाई कमी करू अशा विविध आश्वासने दिली होती ती आज एप्रिल फुल म्हणून गणली गेली, म्हणजेच देशातील जनतेला नुसता आश्वासनांचा बाजार दिला गेला म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस धाराशिव च्या वतीने एप्रिल फुल आंदोलन करण्यात आले.

     यावेळी उपस्थित युवक जिल्हा उपाध्यक्ष समाधान बाराते, युवक शहराध्यक्ष सौरभ देशमुख, युवक जिल्हा सचिव प्रवीण लाडुळकर,अजयकुमार कोळी, तुळजापूर युवक शहर अध्यक्ष शरद जगदाळे,विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर निंबाळकर,शहर उपाध्यक्ष अनिकेत पाटील, वैभव मोरे ,युवक तालुका उपाध्यक्ष विजय घोगरे,महेश सुरवसे तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top