धाराशिव / प्रतिनिधी-

निर्णय वेगवान... महाराष्ट्र गतीमान’ अशा जाहिरातबाजीवर कोटय़ावधी रुपये खर्च करणाऱया शिंदे - फडणवीस सरकारच्या काळात शेतकऱयांना अद्यापही खरीप 2022 मध्ये सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे अनुदान मिळालेले नाही. 31 मार्च पर्यंत हे अनुदान वितरीत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहात दिले होते. मात्र मुख्यमंत्र्याचे हे आश्वासन शेतकऱयांसाठी ’एप्रिल फुल’ ठरले. अशा या बेशरम सरकारचा आज शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमदार कैलास घाडगे - पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरकारला बेशरमाची झाडे देत निषेध व्यक्त करण्यात आला. 

यावेळी बोलताना आमदार कैलास घाडगे - पाटील म्हणाले की, खरीप हंगाम 2022 मध्ये सततच्या पावसामुळे नुकसानीची नुकसान भरपाई देण्यासाठी 222 कोटी रूपयाचा प्रस्ताव 30 ऑक्टोबर 2022 रोजी शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या संदर्भात 30 नोव्हेंबर रोजी अभ्यास गटाची नेमणूक करण्यात आली असून हिवाळी अधिवेशनात व अर्थसंकल्प अधिवेशनात 31 मार्च 2023 पुर्वी मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली होती. मात्र ही घोषणा शेतकऱयांसाठी केवळ एप्रिल फुल ठरली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात कांद्यास 200 क्किंटल मर्यादे पर्यंत 350 रूपये प्रती क्विंटल अनुदानाची घोषणा केली होती. मात्र हे अनुदान देण्यासाठी शासनाने जाचक अटी लादल्या आहेत. धाराशिव जिह्यातील व राज्यातील 80 टक्के शेतकरी हे आंध्रप्रदेशातील हैद्राबाद तसेच कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथे कांदा विक्रीसाठी प्राधान्य देतात. या शेतकऱयां संदर्भात कोणतीही अनुदानासाठी तरतूद नाही. तसेच ई पी पाहणीच्या जाचक अटिमुळे बहुतांश शेतकरी कांदा अनुदानापासुन वंचित राहणार. 2021 व 2022 च्या खरीप हंगामातील पीक विमा देण्या बाबत आणि कंपनीवर कारवाई करून मंजूर पीक विमा देण्यासाठी शासन उदासीन आहे. आनंदाचा शिदा घोषणा करुनही गोर गरीब जनतेला मिळालेला नाही. आंबेडकर जयंती, रमजान ईद करीता आनंदाचा शिदाचे वाटप करण्यात यावे अन्यथा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आमदार कैलास घाडगे - पाटील यांनी दिला. 

  या आंदोलनात आमदार कैलास घाडगे - पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, उपजिल्हाप्रमुख विजय सस्ते, तालुकाप्रमुख सतिश सोमाणी, माजी गटनेते सोमनाथ गुरव, माजी शहरप्रमुख प्रविण कोकाटे, प्रदिप साळुंखे, उपशहरप्रमुख बंडू आदरकर, माजी नगरसेवक रवि वाघमारे, नगरसेवक बाळासाहेब काकडे, माजी नगरसेवक राणा बनसोडे, संग्राम देशमुख, रवि कोरे - आळणीकर, अतुल चव्हाण, अमित उंबरे, सतिश लोंढे, सुधीर उंबरे, आण्णासाहेब दुधभाते, पोपट खरात, माजी नगरसेवक राजाभाऊ पवार, प्रशांत धोंगडे, दिपक जाधव, सचिन सावंत, पांडुरंग भोसले, पंकज पाटील, उपशहरप्रमुख प्रशांत साळुंखे, मुजीब काझी, नाना घाडगे, बाबु पडवळ, काकासाहेब शिनगारे, आदित्य हंबीर, राकेश सुर्यवंशी, संकेत सुर्यवंशी, हनुमंत देवकते, अभिजित कदम, पांडुरंग माने, संतोष शिंदे, संतोष डुकरे, महेश लिमये, साबेर शेख, आण्णासाहेब दुधभाते, धनंजय इंगळे, पंडीत देवकर, अंकुश मोरे, सुनिल गरड, विशाल जमाले, तुळशिदास जमाले, शिवाजी बेडके, किशोर साळुंखे, रियाज शेख, अफरोज पिरजादे, राम साळुंखे, विजय ढोणे, कलिम कुरेशी, सुरेश गवळी, निलेश शिंदे, अमोल थोडसरे, आबासाहेब सारडे यांच्यासह शिवसैनिक शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.


  

 
Top