धाराशिव / प्रतिनिधी-

 राज्याचे युवा धोरण 2012 अंतर्गत शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीने शासन निर्णय 12 नोव्हेंबर 2013 अन्वये जिल्ह्यात कार्यरत असलेल्या युवक–युवतींना व नोंदणीकृत संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा आणि युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे. यासाठी जिल्ह्यातील युवक, युवती तसेच नोंदणीकृत संस्थांकडून जिल्हा युवा पुरस्कार 2019-20, 2020-21, 2021-22, 2022-23 या चार वर्षाच्या युवा पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत असून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 17 एप्रिल, 2023 अशी आहे.

  अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून प्राप्त करून घ्यावेत व अधिक माहीतीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले आहे.    


 
Top