धाराशिव / प्रतिनिधी-

 येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, येथे औषधवैद्यकशास्त्र बाह्यरुग्ण विभागात वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या संकल्पनेतून मिशन थायरॉईड या अभियानाचे उद्घाटन जेष्ट फिजीशियन वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. भारत माने सर यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता  डॉ. शिल्पा वसंतराव दोमकुंडवार, रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. तानाजी लाकाळ, मेडिसीन विभाग प्रमुख तथा नोडल अधिकारी डॉ. सचिन चौधरी, तसेच अधिसेविका सुमित्रा गोरे , पदवीपूर्व विद्यार्थी व इतर मान्यवराची उपस्थीती होती. महिलांमध्ये थायरॉइड हा आजार जास्त प्रमाणात आढळून येतो. या आजाराला वेळीच नियंत्रनात आणण्यासाठी जास्ती जास्त महिलांनी थायरॉईडची तपासणी करून घ्यावी, व पुढील संभाव्य धोके टाळावेत असे अवाहन जेष्ठ वैद्यकीय फिजीशियन डॉ. भारत माने  यांनी केले.

 तत्पूर्वी प्रास्ताविक करताना मेडिसीन विभाग प्रमुख तथा मिशन थायरॉईड चे नोडल अधिकारी डॉ. सचिन चौधरी यांनी  मिशन थायरॉइड बद्यल, त्याच्या व्याप्ती बद्यल माहिती दिली. थायरॉइडवर उपचारापुर्वी निदान, चाचणी आवश्यक असते, त्यामुळे एकाच छताखाली चाचण्यासह निदान,उपचार तसेच शस्त्रक्रियेचीही सुविधा दिली जाणार आहे.त्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये दर गुरवारी मेडिसीन बाह्यरुग्ण विभागात ओपीडी. क्र.09 मध्ये दुपारी 12:30 ते 2:30 या वेळेत उपलब्ध असेल अशी माहिती दिली. अधिष्ठाता यांनी थायरॉईड मिशन बद्यल माहिती देवून जास्ती जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे अवाहन केले.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार  डॉ. प्रविण डुमणे यांनी मानले.

 
Top