तुळजापूर / प्रतिनिधी-

धाराशिव जिल्हा स्वराज्य संघटनेच्या जिल्हाअध्यक्ष पदी महेश गवळी व  मराठवाडा प्रवक्तेपदी जीवनराजे इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली.   या नियुक्ती चे पञ  करण पंढरीनाथ गायकर! प्रदेश संपर्क प्रमुख व प्रवक्ते, महाराष्ट्र राज्य यांनी नुकतेच दिले.

  नियुक्ती पञात म्हटलं आहे की,  स्वराज्य संघटनेत आपण कार्यकर्ता म्हणुन

समाधानकारक कार्य केलेले आहे, तसेच प्रशिक्षण  शिबिरात सहभाग घेऊन संघटन बांधणीची  माहिती घेतलेली आहे, त्यामुळे स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्या  आदेशावरुन आपली महेश गवळीची जिल्हाअध्यक्ष व जीवनराजे इंगळे यांची   मराठवाडा प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात येत आहे. त्यांच्या या निवडीचे सर्वच स्तरातुन स्वागत होत आहे.


 
Top