तुळजापूर / प्रतिनिधी-

टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर व ग्राम पंचायत, मंगरूळ ता.तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 24 एप्रिल 2023 हा  " राष्ट्रीय पंचायती राज दिवस" म्हणून साजरा करण्यात आला.  

या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सहाय्यक गट विकास अधिकारी मोहन राऊत, कार्यक्रम अध्यक्षा म्हणून सरपंच सौ. विजयालक्ष्मी डोंगरे, प्रमुख व्याख्याते प्रो.रमेश जारे, पंचायती राज तज्ञ, उप संचालक टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर, श्री. गणेश चादरे, ग्रामीण विकास तज्ञ, टीस, तुळजापूर, श्री. गिरीष डोंगरे, उपसरपंच,  कृषी अधिकारी नवनाथ अलमले, श्री. पवार, टाटा संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते श्री शंकर ठाकरे, ग्राम पंचायत सदस्य, अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा कार्यकर्ती, बचत गटातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्यांनी उपस्थित होते.

या प्रसंगी, कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून प्रो.रमेश जारे हे  पंचायती राज व्यवस्थेमध्ये 73 व्या घटना दुरुस्तीचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ग्रामविकास अधिकारी श्री लक्ष्मण सुरवसे यांनी ग्राम   पंचायतने राबविलेल्या पाणलोट क्षेत्र विकास, स्वच्छता अभियान, पोषण बाग या यशस्वी उपक्रमांची माहिती दिली. 

या प्रसंगी आदर्श पोषण बाग उपक्रम यशस्वीपणे राबविल्या बद्द्ल अंगणवाडी कार्यकर्तीचा सन्मान करण्यात आला.या प्रसंगी, कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच सौ. विजयालक्ष्मी डोंगरे यांनी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने राष्ट्रीय पंचायतीराज दिवस साजरा करण्यासाठी मंगरूळ ग्राम पंचायतची निवड करून ग्रामस्थांना पंचायतीराज व्यवस्थेबद्द्ल व लोकंसहभागा बद्द्ल मार्गदर्शन केल्याबद्द्ल व ग्रामस्थांनी मोठ्या संख्यांनी उपस्थितीती दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.


 
Top