साजन-विशाल जोडीने गीतांच्या माध्यमातून केले प्रबोधन

उमरगा/ प्रतिनिधी-

 विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमता, जातिवाद याविरुद्ध केलेला संघर्ष, देशाला दिलेली राजघटना याविषयी गीते सादर केली.आले नी गेले किती,भल्या भल्याची हरली मती देशाचे संविधान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजनाचा विचार करून संविधानात त्यांचे अधिकार सुरक्षित केले आहेत. संविधान बदलण्याचा विचार डोक्यातून काढून टाका असे साजन-विशाल जोडीने गीतांच्या माध्यमातून प्रबोधन केले.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने शहरातील जुनी जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर बुधवारी (दि.२६) आयोजित साजन-विशाल या प्रसिद्ध गायक जोडीने आपल्या बहारदार आवाजात भीम गीते सादर करून रसिक श्रोत्यांकडून दाद मिळविली.अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.अनिता लोंढे-सरपे होत्या.कार्यक्रमाचे उद्घाटन महात्मा गौतम बुद्ध,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्ज्वलन करून करण्यात आले.यावेळी माजी प्राचार्य डॉ कमलाकर कांबळे, प्रा.डॉ.श्रीकांत गायकवाड, जयंती कमिटीचे अध्यक्ष विक्रांत सुर्यवंशी,जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे माजी उपाध्यक्ष कैलास शिंदे, जिपचे माजी सभापती हरीश डावरे,माजी सभापती दिग्विजय शिंदे,रामभाऊ गायकवाड, नामदेव कांबळे,एस.के.कांबळे(चेले), एस.एम.गायकवाड उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय भीमरत्न पुरस्कार मिळाल्याने डॉ.कमलाकर कांबळे,डॉ श्रीकांत गायकवाड, नामदेव कांबळे यांचा जयंती कमिटीच्यावतीने भव्य सत्कार करण्यात आला.

साजन-विशाल या गायक जोडीने संविधान लिहीत असताना डॉ. बाबासाहेबांनी बहुजन वंचित समाजाला न्याय मिळवून दिला आहे.त्यांनी खंबीर भूमिका घेत संविधान लिहिले व विरोध करणारानाही माघार घ्यावी लागली. याविषयीच्या गीतात झुकले किती …

महारथी माझा भीम…घटनापती…. त्याचबरोबर सप्तरंगात भीम आहे…. निळ्यात भीम आहे चवदार तळ्यात…. श्वासात भीम आहे त्याचबरोबर कोणी हल्ला करील कोणी…गल्ला करील याची मला नाही खंत हे आंबेडकरी चळवळीचे नाते सांगणारे गीत तसेच निळ्या झेंड्याचाअभिमान भीमसैनिकाच्या रोमा रोमात आहे. याविषयीचे गीत तसेच या चळवळीतील महिलांचा सहभाग याविषयी अग बया ग बया…..निळ्या शिवाय रंगच नाही तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे समाज साक्षर झाला असून त्यांच्यामुळे आज समाज मानानं व सन्मानाने व स्वतःचे हक्काचे घर बांधून नोकरी व्यवसाय करतो आहे झालं मना जोग आम्ही….राहिलो नाही केरसुनी माग बांधून….आला भीम जयंतीचा गाडा डीजे वाचतोय….जय भीम वाले पोर या गीताने तरुणाई थीरकली.यासाठी जयंती कमिटीचे सचिव सुभाष काळे,राहुल कांबळे, बालाजी गायकवाड,विकास कांबळे,दत्ता सोनकांबळे,प्रा.रमेशजकाते,ॲड.मल्हारी बनसोडे,ॲड.हिराजी पांढरे,धीरज बेळंबकर,उमाजी गायकवाड,एस.आर.गायकवाड, अभिमन्यू भोसले,संजय कांबळे,संतोष सुरवसे, राजु सूर्यवंशी यांच्यासह युवक, महिला व समाज बांधव उपस्थित होते.


 
Top