धाराशिव / प्रतिनिधी-

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले जयंती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरी करण्यात आली.

     सर्वप्रथम शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

  याप्रसंगी प्रा. राजा जगताप यांनी उपस्थितांसमोर महात्मा फुले यांचा जीवनपट आपल्या मनोगतातून मांडला.  यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री बबन सुर्यवंशी व सर्व गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.       सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.


 
Top