तेर / प्रतिनिधी-

धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर येथे नवरात्र महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मंदिराचे पुजारी नरहरी बडवे यांनी दिली.                                        

 २६ एप्रिलला नवरात्र महोत्सवात मंत्रोच्चारात प्रारंभ होत असून प्रतिदिन सकाळी पवमान अभिषेक ,सकाळी सांडेनऊ ते अकरा पर्यंत संत साहित्याच्या अभ्यासक व लेखिका ह.भ.प. सौ. उर्मिला प्रल्हाद अघोर  ,पूणे(तडवळकर) यांचे विष्णू पुराण व  नृसिंह पुराण यावर व्याख्यान होणार आहे. तर सायंकाळी आरती असा दिनक्रम असणार आहे.४ मे ला दुपारी पाच वाजता ह.भ.प.पद्मनाभ महाराज व्यास यांचे नृसिंह अवतार यावर प्रवचन होणार आहे.५ मे ला महानैवेद्य दाखविण्यात येणार आहे.याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराचे पुजारी नरहरी बडवे यांनी केले आहे.

 
Top