धाराशिव / प्रतिनिधी-

धाराशिव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच धाराशिव यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत राज्यातील प्रसिध्द विचारवंतांनी या विचार मंचावर येऊन विचार मंथन केले आहे. हे व्याख्यानमालेचे 12 वे वर्ष आहे. या वर्षी व्याख्यानमालेचे पहिले पुष्प बुधवार दि. 26/04/2023 रोजी प्रा. डॉ. अशोक नारनवरे, लातूर हे भारतीस संविधान आणि आजचे वास्तव या विषयावर गुंफणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हाधिकारी, धाराशिव हे राहणार आहेत.

    गुरुवार दि. 27/04/2023 रोजी मा. प्रा. आशालता कांबळे, मुंबई हे बौध्द धम्म आणि स्त्री मुक्ती चळवळ या विषयावर दुसरे पुष्प गुंफणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा. अतुल कुलकर्णी पोलीस अधिक्षक,धाराशिव हे राहणार आहेत. हा कार्यक्रम पुष्पक मंगल कार्यालय, नाईकवाडी नगर, आकाशवाणी केंद्राजवळ, धाराशिव येथे संध्याकाळी 6.30 वाजता होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी या दोन्ही व्याख्यानाच्या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंचाचे अध्यक्ष प्रा. रवि सुरवसे यांनी केले आहे.


 
Top