धाराशिव / प्रतिनिधी-

 महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने आयोजित वरिष्ठ (महिला/पुरुष)गट स्पर्धेसाठी धाराशिव ज़िल्हा अॅथलेटिक्स संघटनेच्या  वतीने जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा व जिल्हा संघाची निवड चाचणी श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम धाराशिव येथे रविवार दि.7/05/2023 रोजी सकाळी  8:30 वा. आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये  १०० मी ,२०० मी, ४००मी ,८००मी,१५००मी,५०००मी,१००००मी, गोळा फेक, लांब उडी ,उंच उडी, थाळी फेक ,भाला फेक   ४*१००मी रिले,4*400 रिले व इत्यादी या स्पर्धा होणार आहेत यास्पर्धेमधून प्रत्येकी २ विजयी खेळाडू  मुले व मुलींची निवड धाराशिव जिल्हा संघात केली जाणार आहे.खेळाडूंनी सोबत आधार कार्ड ,जल्म दाखला(नगरपालिका/ग्रामपंचायत), २ पासपोर्ट साइज फोटो,10वी प्रमाणपत्र(सनद) सोबत आणावे.यासाठी राजू सोलनकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत करण्यात आली आहे त्यामध्ये सदस्य म्हणून सुरेंद्र वाले, मुनीर शेख ,माऊली भुतेकर,अजिंक्य वराळे यांची तर राजेश बिलकुले यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती निवड करण्यात आली आहे त्यामध्ये सदस्य म्हणून सचिन पाटील,योगेश उपळकर,रोहित सुरवसे,प्रशांत बोराडे,ऋषीकेश काळे,अश्विन पवार हे आहेत.स्पर्धा प्रमुख म्हणून श्री संजय कोथळीकर यांची निवड करण्यात आली आहे. यास्पर्धेत अधिकाधिक खेळाडुनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष भरत जगताप  व सचिव योगेश थोरबोले यांनी केले आहे . अधिक माहितीसाठी योगेश थोरबोले (9860609056),माऊली भुतेकर(9404193674),रोहित सुरवसे(7796756866)यांच्याशी संपर्क साधावा.


 
Top