धाराशिव / प्रतिनिधी-

 विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले, जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे,जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. 

समितीच्या वतीने राबविण्यात आलेल्या शासकीय माहिती योजनांचा मेळावा,मुस्लिम समाज बांधवासाठी रमजान महिन्यातील रोजा ईफ्तार पार्टी अन्य कार्यक्रमाची माहिती समितीचे गणेश रानबा वाघमारे यांनी दिली, सांस्कृतिक सभागृह शौचालय बगिचा यासाठी जिल्हाधिकारी यांनी मागणी केलेल्या निधी बाबतही चर्चा करण्यात आली.आज रोजी लाईफ केअर अॅक्सिडेंट व मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल तर्फे घेण्यात आलेले आरोग्य शिबिर,नागरिकांसाठी भोजनदान याबाबत चर्चा करण्यात आली तर पत्रकार बांधव यांनी देखिल या वेळी उपस्थिती दाखविली.पुजणीय भंते सहीत समितीचे बाबासाहेब बनसोडे,धनंजय वाघमारे,गुणवंत सोनवणे, गणेश रानबा वाघमारे,अंकुश उबाळे,संजय गजधने,प्रविण जगताप,संग्राम बनसोडे,संपतराव शिंदे,बलभीम कांबळे,रमेश कांबळे,दिपक पांढरे,आबा धोंगडे,विनायक गायकवाड,श्रीकांत गायकवाड,किसन घरबुडवे,कसपटे सर,राजेंद्र धावारे,मोटार वाहन संघटनेचे उत्तम घरबुडवे,विनय सारंग,दत्ता एडके,तर पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष युवराज नळे,राजसिंह निंबाळकर,खासदार ओमराजे निंबाळकर,आमदार कैलास पाटील,माजी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष धिरज पाटील,राजाभाऊ शेरखाने, अब्दुल लतिफ,प्रशांत पाटील,अग्निवेश शिंदे,शिलाताई उंबरे,माजी नगरसेवक सिध्दार्थ बनसोडे,राणा बनसोडे हे देखील आवर्जुन उपस्थित होते,आरोग्य शिबीरातील आलेल्या वैद्यकीय अधिकारी कर्मचारी व आलेल्या मान्यवर यांचे पुष्प देऊन स्वागत करुन पेढे वाटण्यात आले,सुत्रसंचलन धनंजय वाघमारे यांनी केले तर आभार प्रविण जगताप यांनी मानले.


 
Top