तेर / प्रतिनिधी-

धाराशिव तालुक्यातील तेर येथे श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेत धाराशिव तालुक्यातील तेर येथील सोमनाथ माने विजेता ठरला. कुस्ती स्पर्धेतील विजेत्यांना माजी गृहमंत्री डॉ.पद्मसिंहजी पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

यावेळी पृथ्वीराजसिंह पाटील, पद्माकर फंड, सरपंच दीदी  काळे, उपसरपंच श्रीमंत फंड, प्रविण साळुंके,  भागवत भक्ते, मंगेश फंड, नवनाथ पसारे, अजित कदम,प्रतिक नाईकवाडी, रामा कोळी ,बापू नाईकवाडी, अविनाश आगाशे, धनंजय आंधळे, जुनेद मुमीन ,संजय लोमटे आदी उपस्थित होते.यावेळी पंच म्हणून  नानासाहेब भक्ते , नवनाथ पसारे ,गोविंद घाडगे, संजय जाधव ,राजेंद्र पसारे ,शाम गायके, मच्छिंद्र भक्ते ,हरि भक्ते यांनी काम पाहिले.


 
Top