तुळजापूर/ प्रतिनिधी-

 शहरातील तहसिल जवळील चैताली फोटो स्टुडिओ समोरील रोडवर  मोटार सायकल वरुन आलेल्या दोन  अज्ञात चोरट्यांनी   हातातील सहा लाख रुपये  असलेली  पिशवी हिसकावुन घेवुन पळुन गेल्याची घटना सोमवार दि २३रोजी दुपारी २.२३वा. घडली.या घटनेने सर्वञ घबराहाटीचे वातावरण पसरले आहे.

 या प्रकरणी अधिक माहीती अशी की ,  मोहमद वाजीद  अब्दुल  , माजीद  इनामदार (वय ५१)  हे  त्याचे मित्र इकबाल दाऊद शेख (रा . नळदुर्ग  ता .तुळजापूर)  हे  जुने बसस्थानक तुळजापुर ते रजिस्ट्री ऑफिस तुळजापुर कडे पायी चालत जात असताना समोरून अनोळखी दोन  इसम मोटार सायकलवरती वेगात येवुन मोहमद वाजीद यांच्या   हातातील पैशाचे पिशवीला जोराचा झटका मारून पिशवी हिसकावुन घेवुन पळुन  वेगाने फरार झाले. 

मोहमद वाजीद अब्दुल माजीद इनामदार यांनी दिलेल्या फिर्याद वरुन   मा.पो.नि सो. यांचे आदेशाने गुरंन 164/2023 ,कलम ३९२.३४.भादंवी अन्वय   गुन्हा दाखल करून पुढील  पोउपनि पवार यांचेकडे दिले.

 
Top