धाराशिव / प्रतिनिधी-

ज्युनियर आय ए एस फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी तालुका जिल्हा उस्मानाबाद येथील इयत्ता चौथी मधील विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत चमकले. एकूण 3 विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन  वर्गशिक्षिका श्रीमती क्रांती मते यांनी केले.

त्यांच्या या यशाबद्दल जि प प्रा शाळा आळणीचे मुख्याध्यापक श्री बशीर तांबोळी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी तसेच मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती मते क्रांती यांचे अभिनंदन केले.. त्यावेळी शाळेतील सर्व शिक्षक वृंदा व पालक  उपस्थित होते.

 
Top