तुळजापूर  / प्रतिनिधी

तुळजापूर यंदा श्रीतुळजाभवानी  मातेच्या चैञी  पोर्णिमा  याञेस भाविक मोठ्या संखेने आले होते माञ प्रशाषणा कडुन करण्यात आलेले नियोजन प्रत्यक्षात न उतरता कागदावर राहिल्याचे दिसुन आला याचा परिणाम  भाविकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागले.

माञ श्रीतुळजाभवानी मंदीर महाध्दार समोरील अतिक्रमणे न हटविल्याने त्यात किरकोळ विक्रेते येथे ठाण मांडुन व्यवसाय करीत असल्याने  येथे भाविकांना सतत ढकलाढकलीला  चेंगराचेंगरीस सामोरे जावे लागत होते. येथे चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थितीत सातत्याने निर्माण होत होती .

तसेच सोललेले नारळ महाध्दार दिवसभर समोर वाढवत असल्याने येथे घाणीचे साम्राज्य दिवसभर दिसुन आले.येथे बीव्हीजे सुरक्षा कंपनीचे सुरक्षा रक्षक यांना नारळ फोडण्या पासुन प्रतिंबध करीत नव्हते मंदीरासमोर पडलेला कचरा न सातत्याने उचलला न गेल्यामुळे दिवसभर घाणीचे साम्राज्य होते 

बांगड्या विक्रेत्या महिला  महाध्दार समोर  बसुन  व्यवासाय करीत  असल्याने  फुटलेल्या बांगड्याचे काचा  भाविकांचा पायात घुसुन भाविक मोठ्या संखेने जखमी झाले होते. शहरात वाहने येवु नये म्हणून बँरेकेटींग लावले  होते तरीही  बँरृकेटींग च्या ऐका बाजुने वाहने   मोठ्या संखेने शहरात प्रवेश करीत होते. गुरुवार सांयकाळी काही काळ अर्धा शहरातील विद्युत प्रवाह बंद झाल्याने अर्धा  शहरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाल्या भाविकांना याचा ञास सहन करावा लागला. एकंदरीत यंदा नियोजन कागदापञी झाल्याने भाविकांचे मोठे हाल झाले.

  भाविकांचे हाला

श्रीतुळजाभवानी मातेच्या चैञी पोर्णिमा निमित्ताने भाविक लाखोच्या संखेने आले माञ एसटीने केलेली सोय अपुरी पडल्याने भाविकांना  एसटी  मिळत नसल्याने जुने बसस्थानक  हाऊस फुल्ल झाले होते. एसटी महामंडळाने १३० जादा बसेसची सोय केली होती. माञ महिलांना एसटीत पन्नास टक्के सवलत  दिली. त्यामुळे महिला भाविक प्रवासांचा ओघ वाढल्याने एसटीचे चैञी याञा नियोजन गुरुवार दुपार नंतर कोलमडल्याचे दिसुन आले एसटी स्थानकात दाखल होताच त्यात बसण्यासाठी शंभरचा वर प्रवाशी एस टी कडे धावत असल्याने  वृध्द तसेच  महिला प्रवाशांचे चेंगराचेंगरी होवुन प्रचंड हाल झाले.  

 
Top