उमरगा / प्रतिनिधी-

 मराठवाडा कॉमर्स अँड इंडस्ट्रीज असोसिएशन व गया फाउंडेशन पिंपरी चिंचवड पुणे यांच्या वतीने उद्योजक स्नेह मेळावा व पुरस्कार सोहळा 2023 चा मराठवाडा भूषण पुरस्कार टाटा इंटरनॅशनल लिमिटेड चे सीईओ डॉक्टर साळुंके (ठाकूर) यांना मिळाल्याने उमरगा भागात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. 

मराठवाडा कॉमर्स अँड इंडस्ट्रीज असोसिएशन व गया फाउंडेशन पिंपरी चिंचवड पुणे यांच्या वतीने दिनांक 2 एप्रिल रोजी कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी येथे पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते व दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे चेअरमन पद्मश्री डॉक्टर मिलिंद कांबळे यांच्या हस्ते डॉ. साळुंके व त्यांच्या सुविध्य पत्नी सौ संध्या सुरेश साळुंखे (ठाकूर) या उभयंताचा मानचिन्ह, शाल पुष्पहार व पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. 

डॉ.सुरेश तुळशीराम ठाकूर राहणार गुंजोटी तालुका उमरगा यांना गेल्याच महिन्यात मध्यप्रदेशात जागतिक गुंतवणूकदारांच्या मीटिंगमध्ये पंतप्रधान राष्ट्रपती मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह, संजीव बजाज, टाटा उद्योग समूहाचे नोएलजी टाटा, यांच्या उपस्थितीत 2022 चा टॉप टेन चा उत्कृष्ट सीईओ चा अवॉर्ड मिळाला आहे. पुणे येथे झालेला उद्योजक मेळाव्यात मराठवाड्यातील हजारो उद्योजकांची उपस्थिती होती याच मेळाव्यात मराठवाडा उद्योग रत्न पुरस्कार, मराठवाडा समाज रत्न पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, समाजगौरव पुरस्काराने ही यावेळी गौरविण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव कै.अण्णासाहेब पाटील शैक्षणिक स्कूलचे चेअरमन रमेश पोकळे, राम चौबे उपजिल्हाधिकारी पुणे, सौ.शुभांगी ताई विक्रांत लांडे, चंद्रकांत कुलकर्णी, तानाजी धुमाळ,पोलीस निरीक्षक भोसरी राजेंद्र निकाळजे आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आलेपुरस्कार विक्री करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजक उद्योजक दत्तात्रेय राठोडे, सुनील काकडे, रवी पाटील व एम सी आय चे कार्यकर्ते व गया फाउंडेशनचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. डॉ.सुरेश ठाकूर यांना मराठवाडा भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल अनेक मान्यवरांना मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून गुजराती व परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. 

 
Top