लोहारा/प्रतिनिधी

भावा भावांमध्ये झालेल्या हाणामारीत एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना पुढील उपचारासाठी धाराशिव येथील रूग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना लोहारा शहरात दि.9 एप्रिल 2023 रोजी  सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली आहे. 

पोलिसांकडून मिळालल्या माहितीनुसार, लोहारा तालुक्यातील नागराळ येथील रमेश शेषेराव गोरे व उमेश शेषेराव गोरे या भावंडांमध्ये गेले दोन ते तीन वर्षापासून प्रॉपर्टीवरुन वाद सुर आहे. यामध्ये सातत्याने वाद सुरू होता. रविवारी उमेश गोरे व त्यांची पत्नी दुचाकीवरुन जात असताना त्यांचे भाऊ रमेश याने चारचाकी गाडीने धडक देऊन जखमी केले. आरोपी रमेश याचे शहरातील कदम कॉम्पलेक्समध्ये असलेल्या पानटपरीवर आला. त्यावेळी त्याचे तीन भाऊ अनिल गोरे, सुरेश गोरे व गणेश गोरे यांनी रमेश याला उमेश या लहान भावाला गाडीचा धक्का देऊन जखमी का केले, असा जाब विचारल्यावरून भावंडांमध्ये वाद सुरू झाला. आरोपी रमेश याने तीघा भावांवर धारदार शस्त्राने वार केले. यात गणेश गोरे (वय 45) यांचा जागीच मृत्यू झाला. अनिल व सुरेश यांच्या पोटात, हाता, पायाला चाकूचे वार लागल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ लोहारा शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने जखमींना पुढील उपचारासाठी धाराशिवला हलविण्यात आले आहे. घटना कळताच पोलिस निरीक्षक अजित चिंतले, पोलिस उपनिरीक्षक रविकुमार पवार, हवलदार विठ्ठल धवण, बीट अंमलदार बोळके यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर उमरगा येथील उपविभागिय पोलिस अधिकारी रमेश बरकते यांनी घटनास्थळाला भेट देऊन पहाणी केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अजित चिंतले करीत आहेत.

 
Top