तुळजापूर /प्रतिनिधी - 

श्रीतुळजाभवानी मातेच्या दर्शनार्थ  मंगळवारी दि १८ रोजी भक्तांची प्रचंड गर्दी झाली होती.कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ  मंगळवार पहाटे पासुन भाविकांनी गर्दी केली होती.  हा भाविकांचा ओघ सांयकाळ पर्यत जैसे थे होता.

 



पहाटे एक  वाजता चरणतिर्थ होवुन धर्म दर्शनास आरंभ झाला. मंगळवारी भाविकांनी आपआपल्या  पुजारीवृंदाकडे  पंचामृत अभिषेक, साडी-चोळी अभिषेक, पुजा, दंडवत,  खणनारळ -ओटी, गोंधळ ,  माळपरडी घेणे,  नैवध सह अनेक देविच्या पुजा  केल्या.  आज वाहनतळे वाहनांनी  भरभरुन गेले होते.

नेहमी प्रमाणे दोन्ही महाध्दारांन समोर किरकोळ विक्रत्यांनी ठाण मांडल्याने भाविकांना येजा करताना कसरत करावी लागत होत्या. देवीदर्शनानंतर भाविक लगेच बाजारपेठेत प्रसाद पुजेचे साहित्य देविचे फोटो घेण्यासाठी गर्दी केल्याने बाजारपेठ भाविकांनी फुलुन  गेली होती.

  महाध्दारांन समोर वाढीव मंडप 

  उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर  श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांना उन्हाचे चटके बसु नये म्हणून श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने मंदीर महाध्दारांन  समोर पांढरे पडदे मारण्यात आल्याने भाविकांना उन्हाळा चटक्या पासुन सुटका झाली आहे.  सदरील मंडपाचे श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान तथा जिल्हाधिकारी डाँ. ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे  यांनी काम पुर्ण करुन घेतले. 

 
Top