धाराशिव / प्रतिनिधी-

तक्रारदार यांना सन 2019 मध्ये जुगाराच्या गुन्ह्यात मदत केली आणि कलम 353,307 मध्ये आरोपी केले नाही म्हणून रू 5,00,000/- (पाच लाख रुपये ) किंवा सेकंड हॅन्ड गाडी लाचेची मागणी करून तडजोडीअंती रू 90,000/- (नव्वद हजार रुपये ) लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केल्याच्या आरोपावरून परंड्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकासह पोलिस शिपाईवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. धाराशिव जिल्ह्यातील वाशीत पत्त्याच्या क्लबवर रेड टाकण्यात आली होती, या प्रकरणाची किनार याला आहे.

भगवान भरत नाईकवाडे (सहायक पोलीस निरीक्षक, वर्ग -2, पोलीस ठाणे परंडा, जिल्हा धाराशिव) व  सागर वसंतराव कांबळे (पोलीस शिपाई, वर्ग -3, पोलीस ठाणे परंडा, जिल्हा धाराशिव) अशी आरोपींची नावे आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक विकास राठोड, पोलीस अमलदार  दिनकर उगलमोगले, मधुकर जाधव, अर्जुन मारकड,सचिन शेवाळे,विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर, विशाल डोके आदींच्या पथकाने की है । 

 
Top