कळंब / प्रतिनिधी-

 शि.म ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील वाणिज्य  विभागातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा.सुनिल पवार सर उपस्थित होते. त्यांनी  यशप्राप्तीसाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही असे म्हंटले. तसेच आजचा हा निरोपाचा सोहळा म्हणजे आपल्यासाठी संपणारी वाट न ठरता उद्याच्या उज्ज्वल भवितव्याची पहाट ठरावी अशा मनस्वी शुभेच्छा प्राचार्य पवार यांनी दिल्या. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी युवा व्याख्याते प्रतिक गायकवाड हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मान्यवर म्हणुन उपस्थित होते. ते बोलताना म्हणाले की विद्यार्थी दशेपासुन घेतलेली प्रचंड मेहनत, जिद्दीने यशाच्या दिशेने केलेली वाटचाल, आत्मविश्वासाने केलेला अभ्यास या  गोष्टी आपले ध्येय गाठण्यासाठी महत्वपुर्ण ठरतात.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॅा.संजय सावंत सर यांनी केले ,तर सुत्रसंचालन द्वितीय वर्षाची विद्यार्थीनी साक्षी तोष्निवाल ने केले. वाणिज्य विभागात पदवीचे तृतीय वर्षाचे शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थांनी  आपली मनोगते व्यक्त केली तसेच महाविद्यालयातील वेगवेगळे अनुभव सांगितले. यानिमित्ताने वर्षभरात वाणिज्य विभागामार्फत घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांची चित्रफीत दाखविण्यात आली, आणि बक्षीस वितरण करण्यात आले.

  या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य  डॅा.भगवान सर, तसेच डॅा.गुंडरे सर, डॅा.सुर्यवंशी सर, डॉ. ढोले सर, डॉ. मस्के सर, डॅा.साकोळे सर, डॉ.पावडे सर,प्रा.दळवी सर, ग्रंथपाल प्रा फाटक सर, प्रा. अंकुशराव सर, प्रा. बाबर सर, प्रा. शिंदे सर, प्रा. फेरे सर आदी प्रद्यापक उपस्थित होते. तसेच  मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उपस्थित होते.       कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी डॅा. नागनाथ अदाटे सर, डॉ. खोसे सर, प्रा तांबोळी सर  यांनी मेहनत घेतली.


 
Top