धाराशिव / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन रविवार दि.३१ मार्च २०२३ रोजी जागजी, ता.धाराशिव येथे सकाळी १०:०० ते ४:०० या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात जागजी व परिसरातील सर्व वयोगटातील ६२५  महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

 कार्यक्रमाचे उद्घाटन  मा.सभापती दत्ता देवळर, यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे, तालूका उपाध्यक्ष विजय हाऊळ, मा.उपसरपंच भिमराव सावंत, उपसरपंच वैजीनाथ सावंत, दौलतराव देशमुख, क्रांतीसिंह गरड, कृष्णा सावंत, जिवंन सावंत, धनराम गरड, अमृता गरड, सागर गरड, केशन गरड, सुर्यकांत इंगळे, हर्षवर्घन देशमुख तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप सावंत,मनोज गरड इत्यादी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.‍ अजित निळे, डॉ.विश्वजीत कदम, डॉ. क्लिंटन डिसील्वा, डॉ.ऐश्वर्या, डॉ.दिपक नायर, डॉ.अजय राघवन यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे विनोद ओव्हळ, अमिन सय्यद, पवन वाघमारे,  निशिकांत लोकरे, सचिन व्हटकर, व जागजी केंद्राच्या आशा कार्यकर्ता मैना पवार, मनिषा माळी, अलका देशमाने, भाग्यश्री कसपटे व इंगळे सविता यांनी परीश्रम घेतले.

 
Top