धाराशिव   / प्रतिनिधी-

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय महाराष्ट्र राज्य तर्फे जागतिक वारसा दिन दि.१८ एप्रिल रोजी साजरा करण्यात आला,दि १८ एप्रिल ते दि २३ एप्रिल पर्यंत चालणा-या जागतिक वारसा सप्ताहात प्राचिन वास्तु,वारसाचे जतन व माहिती योजना विषयक मार्गदर्शन केले जाते याला अनुसरून उस्मानाबाद येथील प्राचीन लेणी धाराशिव लेणी नावाने प्रचलित असुन या लेण्याचे सुशोभीकरण करणे आवश्यक आहे,काही वर्षांपूर्वी या लेण्याची डागडुजी करण्यात आली होती परंतु आज रोजी या ऐतिहासिक लेण्याची दुरावस्था झाली आहे,याचे सुशोभीकरण करतांना लेण्यातील सर्व खोल्या,भिंती,छत,खांब, जमिन सपाटीकरण करतांना पाठीमागे केलेल्या कामातील लावलेल्या माती,सिमेंट व प्लास्टिक आॅफ पॅरीसचे थर घासुन काढले पाहिजेत जेणेकरून नविन काम करतांना चांगल्याप्रकारे काम करता येईल,तसेच तिथे पार्किंग,गार्डन,पाणी व लाईटची सुविधा उपलब्ध केली पाहिजे.जेणेकरुन प्राचीन काळापासून चालत आलेल्या भव्य अशा वास्तुला पाहण्यासाठी आणि उस्मानाबादच्या पर्यटनात वाढ होऊन पर्यटकांची संख्या वाढण्यासाठी मदत होईल.धाराशिव लेणीचे सुशोभीकरण करण्याबाबत सहकार्य करावे अशी विनंती पर्यटन जनजागृती संस्था उस्मानाबाद संचलित पर्यटन विकास समिती उस्मानाबाद यांच्या वतीने करण्यात आली आहे.यावेळी पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष युवराज नळे,सचिव देविदास पाठक, रणजीत रणदिवे,अब्दुल लतिफ,गणेश वाघमारे,दिपक पांढरे अन्य इतर उपस्थित होते.

 

 
Top