धाराशिव / प्रतिनिधी-

 विश्वभूषण बोधीसत्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त डी.एस. ग्रुपच्या वतीने भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही मिरवणुक गुरुवार दि. 20 एप्रिल 2023 रोजी दूपारी 4.00 वाजता क्रांती चौक भिम नगर येथून निघणार आहे. तरी या मिरवणूकीमध्ये जास्तीत जास्त उपासकांनी सहभागी व्हावे असे आवाहन डी.एस. ग्रुपचे मार्गदर्शक मा. धनंजय (नाना) शिंगाडे व विश्वभूषण बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

    धाराशिव शहरात मागील 25 वर्षापासून डी.एस. ग्रुपच्या वतीने दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भव्यदिव्य स्वरुपात साजरी केली जाते. या ही वर्षी समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार 20 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच शासकीय वौद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात  सकाळी 10.30 वाजता रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. दूपारी 2.00 वाजता नगर परिषद शाळा क्र. 9 येथे भोजनदान करण्यात येणार आहे. दूपारी 4 वाजता क्रांती चौक, भिम नगर येथून भव्य मिरवणूकीस प्रारंभ होणार आहे. रात्री 12 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे अतिषबाजीने मिरवणूकीचा समारोप होणार आहे.

    या मिरवणूकीचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, मुख्याधिकारी वसुधा फड यांच्या हस्ते होणार आहे. तसेच जिल्हयातील विविध राजकीय पक्ष, संस्था, संघटनांचे प्रतिनिधी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

    तरी या भव्य मिरवणूकीस जास्तीत जास्त उपासकांनी सहभाग व्हावे असे आवाहन डी.एस. ग्रुपचे मार्गदर्शक मा. धनंजय शिंगाडे व जयंती समारोह समितीचे अध्यक्ष राजाभाऊ बागल, कार्याध्यक्ष रावसाहेब शिंगाडे, उपाध्यक्ष बावेश काशिद/योगेश वाघमारे, कोषाध्यक्ष विशाल शिंगाडे, सचिव नितेश जानराव व आदि पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.


 
Top