धाराशिव / प्रतिनिधी- 

कळंब तालुक्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत निपाणी पाडोळी नायगाव रस्त्यावरील व भोसा ते गौर माळीवस्ती रस्त्यावरील दोन्ही ठिकाणच्या पुलाची कामे पावसाळ्यापुर्वी पुर्ण करण्यात यावीत, अन्यथा येत्या दहा दिवसात काम चालू न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी जिल्हाधिकारी यांना मंगळवारी (दि.१८) दिलेल्या निवेदनात दिला आहे.

या निवेदनात श्री. दुधगावकर यांनी म्हंटले आहे की, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पॅकेज नंबर ओएसएम-एडीबी-बीआर-०२ (१) कन्स्ट्रक्शन आॅफ सबमर्सिबल ब्रिज एट सीएच १०/१०० आॅन एमडीआर १९ ते निपाणी पाडोळी नायगाव रस्ता ०/०० ते १०/६०० किलोमीटर रस्त्यावरील  पुल व भोसा ते गौर माळीवस्ती रस्त्यावरील पुलाचे काम डी. सी. अजमेरा या कंपनीला मिळाले आहे. सदर काम चालू करणेबाबत संबंधित कामाचे कायार्रंभ आदेश १९ आॅगस्ट २०२२ रोजी देण्यात आलेले आहेत. परंतु अद्याप काम चालू झालेले नाही. याबाबत गेले अनेक वेळेस प्रत्यक्ष भेटून काम चालू करण्यासंबंधी संबंधित खात्याशी संपर्क केला असता योग्य माहिती मिळत नाही. त्यामुळे दोन्ही पुलाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याबाबत संबंधित विभागास व कंत्राटदारास सूचित करण्यात यावे, अन्यथा येत्या दहा दिवसात काम चालू न केल्यास लोकशाही मागार्ने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा श्री. दुधगावकर यांनी दिला आहे.


 
Top