धाराशिव/प्रतिनिधी - 

शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया जिल्हा न्यायालय शाखेत ग्राहकांची संख्या मोठी असल्याने महिलांची गैरसोय टाळण्यासाठी येथे अतिरिक्त कॅश काऊंटर सुरू करण्यात यावे, अशी मागणी सौ.मनीषा शिवाजी पाटील यांच्यासह ज्येष्ठ नागरिक व महिलांनी केली आहे. शाखेच्या व्यवस्थापकांना आज (दि.5) मागणीचे निवेदन देण्यात आले.

 निवेदनात म्हटले की, स्टेट बँक ऑफ इंडिया जिल्हा न्यायालय शाखेत ग्राहकांची वाढती संख्या पाहता दोन कॅश काऊंटर असणे गरजेचे आहे. सध्या बँकेत रक्कम जमा करणे अथवा काढण्यासाठी दोन-दोन तासांचा विलंब लागत आहे. त्यामुळे वयोवृद्ध, अपंग व महिलांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे येथे कॅश काऊंटरची संख्या वाढवावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर सौ.मनीषा शिवाजी पाटील, सौ.एस.ए.गायकवाड, ए.ए. करके, संदीप तोडकरी, फराना अत्तार, शिल्पा भालेराव, जावेद अत्तार, तबस्सुम शेख, पद्माकर निकम, तनुजा वाडकर, उमेश चव्हाण यांची स्वाक्षरी आहे.


 
Top