तुळजापूर  / प्रतिनिधी-

 तुळजापूर येथील समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेस या वर्षीच्या आर्थिक वर्षात ६८ लाख ४२ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे संस्थेने २१ वर्षाच्या कालावधीत सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा उमटवला आहे संस्थेचे हे एकेविसावे वर्ष असून संस्थेकडे भाग भांडवल म्हणून १ कोटी ३६ लाख ७२ हजार रु असून संस्थेकडे पावणे चौदा कोटी रुपयांच्या ठेवी आहेत तसेच संस्थेनं आपल्या सभासदांना लहान मोठ्या उद्योग व्यवसायवाढीसाठी ११कोटी २५ लाख रुपये कर्ज वाटप केले असून संस्थेची कर्ज वसुली ९६% इतकी आहे संस्थेने स्वतःच्या नावाने विविध बँका मध्ये ठेवीच्या स्वरूपात ५ कोटी ८० लाख रुपयांच्या ठेवी मध्ये गुंतवणूक केलेली आहे संस्थेस सतत लेखापरीक्षण वर्ग अ असून संस्था दरवर्षी ११ % व्याजदराने लाभांश संस्थेच्या सभासदांना रोखीने वाटप करते संस्थेच्या वतीने आकर्षक व्याजदराने सर्वप्रकारच्या ठेवी स्वीकारण्याची सोय करण्यात आली असून संस्थेच्या सभासदांना अत्यल्प व्याजदरात सोनेतारण वाहन तारण स्थावर मालमत्ता तारण अशा अनेक प्रकारच्या कर्ज योजनेच्या माध्यमातून कर्ज वाटप करण्यात येते सुरक्षितता, विश्वासार्हता, पारदर्शकता व व्यावसायिकता या प्रमुख तत्वांवर संस्थेचे कामकाज सुरू असून त्यामुळे सभासद व ठेवीदार यांचा विश्वास संपादन करण्यात संस्था यशस्वी ठरली आहे.

संस्थेच्या कार्यक्षेत्रात वाढ व शाखा विस्तार

संस्थेचे कार्यक्षेत्र पूर्वी तुळजापूर तालुक्या पुरते मर्यादित होते परंतु यावर्षी संस्थेने आपल्या कार्यक्षेत्रात वाढ केली असून संस्थेचे कार्यक्षेत्र हे धाराशिव जिल्ह्या पुरते मर्यादित झाले असून त्यास सहकार आयुक्तांनी मान्यता दिलेली आहे कार्यक्षेत्रात वाढ झाल्यामुळे लवकरच संस्थेचा शाखा विस्तार होणार असून संस्थेच्या सभासदांना सर्व आधुनिक व विकसित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संस्थेचे कामकाज ऑनलाईन संगणक प्रणालीव्दारे सुरू करण्यात आले असून आर.टी.जी.एस / एन.ई.एफ.टी. व क्यूआर कोड या सेवा सुरू करण्यात येणार आहेत यामध्यांतून ग्राहकांना आर्थिक सेवा देण्याचा संस्थेचा उद्देश आहे संस्थेचे संपूर्ण कामकाज हे संगणकीकृत असून संस्था ही स्वामालकीच्या जागेत कार्यरत असून स्थापनेपासुनच पतसंस्था नफ्यात असून संस्थेला सतत ऑडीट वर्ग ‘अ’ प्राप्त झालेला आहे. संस्थेने भागभांडवल, ठेवी, कर्जव्यवहार, निधी, निव्वळ नफा व गुंतवणूका या सर्वच आर्थिक बाबीमध्ये प्रगती केली आहे. तसेच कर्जवसुली, एनपीए, सिडी रेश्यो या निकषांचे तंतोतंत पालन केले असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष नारायण नन्नवरे यांनी दिली आहे. संस्थेच्या वतीने सभासदांच्या सोयीसाठी मिनी एटीएम सुविधा सुरू करण्यात आली असून संस्थेच्या सभासदांना दैनंदिन व्यवहाराची माहिती व्हावी यासाठी एसएमएस प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे.

संस्थेस सलग तिसऱ्या वर्षी राज्य फेडरेशनच्या वतीने दीपस्तंभ पुरस्कार प्राप्त 

संस्थेच्या वतीनं दरवर्षी सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते या मध्ये प्रामुख्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते या मध्ये संस्थेच्या वतीने जवळपास एक हजार पिशव्या रक्त संकलन केले आहेत्याच बरोबर गरजू दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना उपचारासाठी आर्थिक मदतही केली जाते 

संस्थेच्या याच कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार सलग तिसऱ्या वर्षी  प्राप्त झाला आहे.


 
Top