धाराशिव / प्रतिनिधी-

 फ्रुटी कोणाची ही रहस्य असलेली बाल कादंबरी आहे.किशोरवयीन बालकांचे हावभाव, राहणीमान,व्यथा या बाल कादंबरीत रेखाटलेल्याआहेत. आपल्या घरातील पात्रे आहेत असे वाटते असे प्रतिपादन लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे यांनी केले.   ते सविता करंजकर जमाले लिखित फुटी  कोणाची या बाल कादंबरीच्या प्रकाशन समारंभ सोहळ्यात श्री सिद्ध गणेश मंदिर उस्मानाबाद येथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा साहित्य परिषदेचे उस्मानाबाद अध्यक्ष नितीन तावडे होते.यावेळी व्यासपीठावर कादंबरीकार बालाजी मदन इंगळे व कवी रवींद्र केसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

 बाल कादंबरीवर भाष्य करताना बालाजी मदन इंगळे म्हणाले की नाट्य, रंजकता आणि चित्रशैली निवेदन यामुळे ही कादंबरी वाचनीय झाली आहे.मुलांना आवडणारे कथानक, ओघवती भाषा, बोलके संवाद, पात्रे कादंबरीत असल्यामुळे मुले कादंबरी वाचताना निश्चितच रमतील असे प्रतिपादन वाटते.

 कवी रवींद्र केसकर म्हणाले की कादंबरीतील प्रसंग बाल आहेत.लेकरं भाऊक असतात. अवतीभोवतीची निरीक्षणे बोलीभाषा,मूल्य या कादंबरीत रुजवली आहेत.

 अध्यक्षीय भाषणात नितीन तावडे म्हणाले की लहान मुलांना रुचेल समजेल अशी वर्णने कादंबरीत आहेत.

 प्रारंभी मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी तांबे यांनी तर सूत्रसंचालन प्रा अरविंद हंगरगेकर यांनी केले. कार्यक्रमास साहित्यिक रसिक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी उपस्थितांचे आभार श्रीपती जमाले यांनी मानले.


 
Top