परंडा / प्रतिनिधी- 

तालुक्यातील श्री क्षेत्र सोनारी येथील श्री काळभैरवनाथ यात्रा दि.18 एप्रिल रोजी रथ उत्सव सोहळा उत्साहात पार पडला .यावेळी उपस्थित लाखो भाविकांनी भैरवनाथाचं चांगभलं, भैरवनाथाच्या घोड्याचं चांगभलं, भैरवनाथाच्या काठी चांगभलं ,असा जयघोष करीत गुलाल खोबऱ्याची उधळण करून रथोत्सवात सहभाग नोंदविला.

  सोनारी येथे 16 एप्रिल पासून यात्रा उत्सवास प्रारंभ झाला होता. दि.18 रोजी पहाटेपासून धार्मिक विधीला प्रारंभ झाला तत्पूर्वी कंडारी येथील मानाच्या कावडीद्वारे सोनुबाई तीर्थकुंडातून आणलेल्या पाण्याने श्री काळभैरवनाथ योगेश्वरी ला अभिषेक घालण्यात आला दुपारी१.२५ वाजता मुख्य पुजाऱ्यांनी देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर राज्याचे आरोग्य मंत्री मा.तानाजी सावंत यांच्या हस्ते महाआरती करून उत्सव मूर्तीची रथात प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रारंभी भोंजा येथील मानाचा नाडा रथाला बांधण्यात येऊन रथ ओढण्यास सुरुवात झाली.

सर्वात पुढे धुपारती घेऊन संजय पुजारी, समीर पुजारी, मयुर पुजारी होते . त्यानंतर मानाची बहीण त्यामागे मानाची कंडारी ची कावड सोबत भैरवनाथाची पालखी, घोडा ,त्या पाठोपाठ नाथा चा रथ होता .रथ ओढण्यासाठी भाविकांनी तोबा गर्दी करून रथोत्सवात सहभागी झाले होते. रथ मंदिराच्या प्रवेशद्वारावर येताच दुतर्फा उभारलेल्या भाविकांनी जयघोष करीत रथावर गुलाल खोबऱ्याची उधळण केली जागोजागी भाविकांकडून रथ थांबवून रथाला नवसाची तोरणे चडवली जात होती. रथाने संपूर्ण सोनारी गावाला प्रदक्षिणा घातल्यानंतर सायंकाळी चार वाजता मंदिरात रथ विसावला. यात्रेला राज्याच्या कानाकोपऱ्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश ,गोवा येथून लाखो भाविक आले होते .तत्पूर्वी प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी सचिन ओंबासे,पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,तहसीलदार रेणुकादास देवणीकर ,एपीआय विक्रांत हिंगे यांनी व लोकप्रतिनिधींकडून ,मा जि प उपाध्यक्ष धनंजय सावंत, मा कृषी व पशुसंवर्धन सभापती नवनाथ जगताप यांनी उत्सव मूर्तीचे पूजन केले. यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी धनंजय सावंत, नवनाथ जगताप, सरपंच दीपक दुबळे उपसरपंच परमेश्वर मांडवे,ग्रा.प सदस्य रामकृष्ण जगताप, अंगद फरतडे ,भाऊसाहेब पाटील, सोमनाथ आनवणे यांनी परिश्रम घेतले.

 
Top