धाराशिव/ प्रतिनिधी- 

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जे कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे सर्वांनी शिक्षण घेऊन आपल्या भारत देशाचा विकास करण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे विचार  कार्यक्रमाचे अध्यक्ष  सुधीर कांबळे यांनी मांडले. 

शिंगोली आश्रम शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साह साजरी करण्यात आली. प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधीर कांबळे  , प्रमुख पाहुणे  कुमंत शिंदे , मुख्याध्यापक चित्तरंजन राठोड, पर्यवेक्षक शेख अब्बास अली यांनी  डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून अिभवादन केले. यावेळी सुधीर कांबळे बोलत होते. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेबांच्या जीवन कार्याची माहिती  दिली. 

या कार्यक्रमास   रत्नाकर पाटील , सूर्यकांत बर्दापुरे, चंद्रकांत जाधव, खंडू पडवळ, दीपक खबोले, कैलाश शानिमे, मल्लिनाथ खोंदे, मदनकुमार आमदापुरे, विशाल राठोड, संतोष पालम पल्ले, सतीश कुंभार इत्यादी शिक्षक व कर्मचारी गोविंद बनसोडे, वसंत भिसे, बबन चव्हाण, रेवा चव्हाण, सचिन माळी, अविनाश घोडके, अमोल जगताप इत्यादी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुरेखा कांबळे  व आभार श्रद्धा सूर्यवंशी  यांनी मानले.

 
Top