तेर /प्रतिनिधी

धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेस प्रारंभ झाला असून हरीनामाच्या गजराने तेर नगरी दुमदुमली आहे. 16 एप्रिलला पहाटे आ.राणाजगजितसिंह पाटील, अर्चनाताई पाटील, दत्तात्रय मुळे, उषाताई मुळें, सहाय्यक धर्मादाय आयुक्त एस.पी.पाईकराव यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.

यावेळी ह.भ.प.रघुनंदन महाराज पुजारी,उपसरपंच श्रीमंत फंड, पद्माकर फंड, विलास रसाळ, विठ्ठल लामतुरे, माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी,अॅड.गजानन चौगुले, साहेबराव सौदागर,तेर सोसायटीचे चेअरमन सतिष कदम,मज्जित मनियार, प्रशांत वाघ, रामा कोळी, नवनाथ पसारे, नवनाथ इंगळे,भारत नाईकवाडी, संजय लोमटे व मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.15 एप्रिलला सायंकाळी उशिरा पर्यंत राज्यातील विविध ठिकाणाहून परंपरेनुसार फडकरी दिंड्यांचे तेरमध्ये आगमन झाले. एकादशी निमित्ताने मंदिर व सभामंडप फुलांनी सजविण्यात आले होते. निमित्ताने तेरमध्ये आलेल्या सर्व दिंडंयाची नगर प्रदक्षिणा झाली.नागरीकानी दारासमोर सडा टाकून, सुंदर रांगोळी काढल्या व वारक-यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती.वार्षिक यात्रा महोत्सव असल्याने तेरमध्ये आलेल्या दिंडयामुळे जागोजागी हरीपाठ,भजन, किर्तन व हरीनामाच्या गजराने तेर नगरी दुमदुमून गेली आहे.मिळेल त्या वाहनाने भाविक भक्त तेरमध्ये दर्शनासाठी येत आहेत.पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

यावर्षी पासून श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिरात जो प्रथम वारकरी  दर्शनासाठी येईल त्यांना ही महापूजा करण्याचा मान यावर्षी प्रथमच धाराशिव तालुक्यातील म्होतरवाडी येथील सुरेश दगडू खोत व कालिंदा सुरेश खोत या दांपत्यास मिळाला.त्यांचा सत्कार आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. 

 
Top