धाराशिव / प्रतिनिधी-          

धाराशिव जिल्ह्याचे  आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते पक्ष प्रवेश झाला, मार्गदर्शक  आमदार, भाजप प्रदेश सरचिटणीस  सुजितसिंह ठाकूर , भाजपा धाराशिव जिल्हाध्यक्ष  नितीन काळे, भाजपा धाराशिव जिल्हाउपाध्यक्ष राहुल पाटील सास्तुरकर यांच्या नेतृत्वात आज रविवार दिनांक १६ एप्रिल २०२३ रोजी लोहारा तालुक्यातील उंडरगाव चे सरपंच हिराचंद सुभाष मोरे, माजी सरपंच मलिनाथ विनायक पांचाळ, ग्रामपंचाय सदस्य वंदना बाबासाहेब कोठावळे, रेखा गणेश सुयवंशी, सुयेश चंद्रकांत पवार, सोनाली दिलीप वाघमारे, जयश्री लक्षन वाघमारे, विश्वास गोरोबा ढोबळे, बालाजी भागवत गाडे, महेश शाहु घोडके, यांनी भारतीय जनता पक्षामध्ये औपचारिक पणे प्रवेश घेऊन पक्षाची धेय धोरणे समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्याचे काम सुरू केले. तसेच उंडरगाव गावातील अनेक कार्यकत्यांनी भाजपात प्रवेश करुन पक्षाचे विविध उपक्रम उंडरगाव परिसरात अत्यंत प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार केला.

 यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सरपंच श्री. हिराचंद मोरे, यांचे भाजपात स्वागत करून शुभेच्छा दिल्या. तसेच गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

 
Top