धाराशिव / प्रतिनिधी-

 येथील नगर वाचनालयात जागतिक पुस्तक दिनानिमित्त आज दि.23 एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सदर पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन म.सा.प. धाराशिव शाखेचे सचिव व ग्रंथालयाचे आजीव सदस्य  माधव इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष नितीन तावडे ,सदस्य प्रदीप साळुंके ,आजीव सभासद सुधाकर झोरी ,ग्रंथपाल सुयोग जोशी,प्रणव तावडे , ग्रंथालय कर्मचारी डी.के.शेख, विजय वाघमारे,याकूब पठाण, महानंदा मसणे,उषा पानढवळे  तसेच ग्रंथालयाचे वाचक उपस्थित होते.

 
Top