धाराशिव / प्रतिनिधी-

येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवी चैत्री पौर्णिमा यात्रा दि.06 ते 11 एप्रिल 2023 या कालावधीत होणार आहे. या चैत्री पौर्णिमा कालावधीत मौजे येरमाळा मध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. तसेच दि.06 आणि 07 एप्रिल 2023 या कालावधीत पालखी मिरवणूक, चुनखडी वेचणे आणि पौर्णिमा निमित्त महाराष्ट्रासह इतर राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक वाहनाने येत असतात. अशा वेळी वाहतुकीची कोंडी होवू नये. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचा अपघात होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये या करिता येरमाळा कडे येणाऱ्या मार्गावरील अवजड वाहने अन्य मार्गाने वळविणे आवश्यक आहे.

    दिनांक 06 एप्रिल रोजीच्या रात्री 12.00 ते दिनांक 07 एप्रिल रोजीच्या रात्रीच्या 12.00 पर्यंत सर्व प्रकारच्या अवजड वाहनास औरंगाबाद ते येरमाळा मार्गे बार्शीकडे जाणाऱ्या वाहतुकीस पथक्रमण करण्यास येरमाळा, कुसळंब, बार्शी या दरम्यान मनाई करण्यात येत आहे. बार्शी ते येरमाळा मार्गे औरंगाबाद कडे येणाऱ्या वाहतुकीस पथक्रमण करण्यास बार्शी, कुसळंब, येरमाळा या दरम्यान मनाई करण्यात येत आहे. कळंब ते येरमाळा मार्गे बार्शी कडे जाणारी वाहतुकीस पथक्रमण करण्यास येरमाळा, कुसळंब, बार्शी या दरम्यान मनाई करण्यात येत आहे. बार्शी ते येरमाळा मार्गे कळंब कडे येणाऱ्या वाहतुकीस पथक्रमण करण्यास बार्शी, कुसळंब, येरमाळा या दरम्यान मनाई करण्यात येत आहे. बार्शी ते येरमाळा मार्गे परळी, परभणी कडे येणाऱ्या वाहतुकीस पथक्रमण करण्यास बार्शी, कुसळंब, येरमाळा या दरम्यान मनाई करण्यात येत आहे. परभणी, परळी ते येरमाळा मार्गे बार्शी कडे जाणाऱ्या वाहतुकीस पथक्रमण करण्यास येरमाळा, कुसळंब, बार्शी या दरम्यान मनाई करण्यात येत आहे. कळंब ते येरमाळा, मार्गे औरंगाबाद कडे जाणाऱ्या वाहतुकीस पथक्रमण करण्यास येरमाळा, औरंगाबाद या दरम्यान मनाई करण्यात येत आहे. औरंगाबाद ते येरमाळा, कळंब कडे येणारी वाहतुकीस येरमाळा, कळंब या दरम्यान मनाई करण्यात येत आहे.

 या मार्गावरील वाहने पुढील प्रमाणे मार्गक्रमण करतील :

  औरंगाबाद ते येरमाळा मार्गे बार्शी कडे जाणारी वाहतूक येरमाळा उड्डाण पुलावरुन येडशी मार्गे बार्शी कडे पथक्रमण करतील. बार्शी ते येरमाळा मार्गे औरंगाबाद कडे येणारी वाहतूक बार्शी, कुसळंब, पांगरी, येडशी, येरमाळा उड्डाण पुलावरुन मार्गे ओरंगाबाद कडे पथक्रमण करतील. कळंब ते येरमाळा मार्ग बार्शी कडे जाणारी वाहतूक कळंब, मोहा फाटा (मनुष्यबळ पाटी ), दहीफळ, येडशी, पांगरी, कुसळंब मार्गे बार्शी कडे पथक्रमण करतील. बार्शी ते येरमाळा मार्गे कळंब कडे येणारी वाहतूक बार्शी, कुसळंब, पांगरी, येडशी, दहीफळ, मोहा फाटा ( मनुष्यबळ पाटी) मार्गे कळंब कडे पथक्रमण करतील. बार्शी ते येरमाळा मार्गे परळी, परभणी कडे येणारी वाहतूक बार्शी, कुसळंब, पांगरी, येडशी ढोकी, कळंब मार्गे परळी, परभणी कडे पथक्रमण करतील. परभणी, परळी ते येरमाळा मार्गे बार्शी कडे जाणारी वाहतूक परभणी, परळी, कळंब, ढोकी, येडशी, पांगरी, कुसळंब मार्गे बार्शी कडे पथक्रमण करतील. कळंब ते येरमाळा मार्गे औरंगाबाद कडे जाणारी वाहतूक ही कळंब ते मनुष्यवळपाटी, मांडवा, वाशीफाटा मार्गे औरंगाबाद कडे पथक्रमण करतील. औरंगाबाद, येरमाळा मार्गे कळंब कडे येणारी वाहतूक ही वाशीफाटा, मांडवा, मनुष्यबळपाटी मार्गे कळंब कडे पथक्रमण करतील.

  वरील बंधने ही पोलीस, रूग्ण सेवा, अग्निशमन दलाची वाहने व अत्यावश्यक सेवेतील वाहनांना, हलकी वाहने ( Light Vehicles ) व एस. टी. बसेसला लागू राहणार नाही. असे जिल्हा प्रशासनाद्वारे कळविण्यात आले आहे.

 
Top