धाराशिव / प्रतिनिधी-

 कृषी विभागाकडून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना 2023-24 अंतर्गत नमुद केलेल्या घटक व उपघटकाकरीता लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

 अळिंबी उत्पादन प्रकल्प, क्षेत्र विस्तार (ड्रॅगन फ्रुट, स्ट्रॉबेरी), जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, सामुहिक शेततळे, वैयक्तीक शेततळे अस्तरीकरण, सरंक्षित शेती, (हरितगृह उभारणी, शेडनेट उभारणी, प्लॉस्टीक मल्चिंग, हरितगृहातील उच्च प्रतीची फुले लागवड) फलोत्पादन यांत्रिकीकरण, कांदाचाळ उभारणी, पॅक हाऊस, मधुमक्षिका पालन, एकात्मिक पॅकहाऊस, शितखोली, शितगृह, एकात्मिक शीतसाखळी, रेफर व्हॅन, रायपनिंग चेंबर, पूर्वशीतकरणगृह, प्राथमिक प्रक्रिया केंद्र ( फलोत्पादीत पिके ) फिरते विक्री केंद्र हे घटक राबविण्यात येणार आहेत.

 हा कार्यक्रम राबविताना मार्गदर्शक सूचनांचा काटकोरपणे अवलंब करण्याबाबत व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 10 टक्के व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 9 टक्के व सर्वसाधारण प्रवर्गासाठी 81 टक्के या प्रमाणे विहीत केलेल्या टक्केवारीनुसार लाभ देण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. तरी इच्छूक शेतकऱ्यांनी स्वंतत्ररित्या https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer या ऑनलाईन संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करावी. थेट पध्दतीने अर्ज (ऑफलाईन) कोणत्याही कार्यालयात स्विकारले जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी किंवा मंडळ कृषी अधिकारी तसेच संबधीत कृषी सहाय्यकांशी संपर्क साधावा. अर्ज भरण्याची अंतिम मुदत ‍दि. 10 मे 2023 राहील. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. सी. माने यांनी केले आहे.


 
Top