धाराशिव / प्रतिनिधी-
येरमाळा येथील येडेश्वरी देवी चैत्री यात्रा परिसरात अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्याकरीता दि. 08.04.2023 रोजी यात्रे मध्ये विशेष पथक गस्तीस होते. पथकास गोपनीय माहिती मिळाली की,यात्रा परिसरात काही इसम सोरट व स्ट्रायकर नावाचा जुगार खेळत आहेत. यावर पथकाने नमुद ठिकाणी 21.00 ते 22.30 वा. दरम्यान एकुण 03 ठिकाणी छापे टाकले असता तेथे एकुण 21 इसम हे सोरट व स्ट्रायकर नावाचा जुगार खेळत असताना पथकास मिळून आले. नमुद इसमाकडून एकुण -16,310 ₹ रोख रक्कम व 06 मोबाईल जप्त केले.असुन नमूद इसमाविरुध्द येरमाळा पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत 03 स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन सपोनि कासार, सायबर सेल,पोलीस हावलदार- शेख, पोलीस अंमलदार-कलाल, मोरे, सहाने, राठोड, रहिज, शेख, ताड, मंगनाळे, मायचारी सर्व नेगणुक पोलीस मुख्यालय यांचे पथकाने केली आहे.