धाराशिव / प्रतिनिधी-

  छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक के. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांचा गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने ढोकी पोलीस ठाण्यात फेटा बांधून व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

विशेष पोलिस महानिरीक्षक के. मल्लिकार्जुन प्रसन्ना हे ढोकी पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी करण्यासाठी बुधवारी (दि.1) मार्च रोजी ढोकी येथे आले होते. त्यावेळी त्यांनी ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाºया गावातील पोलीस पाटील यांचीही बैठक घेतली. यावेळी गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने मिडीया जिल्हाध्यक्ष सुभाष कदम-पाटील, मराठवाडा कार्याध्यक्ष राहुल वाकुरे-पाटील व अन्य पोलीस पाटलांच्या हस्ते के. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, कळंब उप विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक एम. रमेश, ढोकी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत, पोलीस उपनिरीक्षक कपिल बुद्धेवार, फौजदार भागवत गाडे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

विशेष पोलिस निरीक्षक के. मल्लिकार्जुन प्रसन्ना पोलीस पाटील यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, गावात सुरू असलेले अवैध धंदे तसेच घडलेल्या व भविष्यात घडणाºया घटनांची माहिती पोलीस पाटील यांनी तात्काळ बीट अंमलदार, पोलीस अधिकाºयांना द्यावी. चांगले काम करणाºया पोलीस पाटील यांना रिवार्ड द्यावे, अवैध धंदे वा घटनेची पोलीसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस पाटील यांचे नाव उघड होणार नाही, याची दक्षता घ्यावी, पोलीस पाटील यांना ओळखपत्र देण्याची कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी पोलीस अधीक्षकांना केल्या.

यावेळी पोलीस पाटील समाधान फुटाणे, धनराज सगर, ज्ञानेश्वर पाटील, विनोद गजधने, शामसुंदर कांबळे, केशव बटणपुरे, महेश घाडगे, सुनील अंधारे, फकिरनाथ कांबळे, महेश वाकुरे, मज्जिद मणियार, धर्मराज हाजगुडे, तानाजी जाधव, अजित शिंदे, फातेमाबेगम मणियार, श्रृतिका हाजगुडे, सुकुमार फेरे, मनिषा घेवारे, सुषमा राणी पांढरे, सुनिता जगदे, स्वाती गवाड आदी पोलीस पाटील उपस्थित होते.

 
Top