धाराशिव / प्रतिनिधी-

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त धाराशिव मध्ये दिनांक 27 व 28 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह या ठिकाणी धाराशिव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मा. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या प्रेरणेतून आणि राजसिंह राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनामध्ये हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

 या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून तहसीलदार गणेश माळी, पोलीस निरीक्षक उस्मान शेख, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, ॲड. खंडेराव चौरे, माजी उपनगराध्यक्ष अभय इंगळे, ॲड.नितीन भोसले, इंद्रजित देवकते, प्रमोद पाटील, संजय आबा मुंडे, दाजी आप्पा पवार, राहुल गवळी, निलेश जाधव, ओम नाईकवाडी, सचिन लोंढे, हिम्मत भोसले, बालाजी जाधव, जगदीश जोशी, राज निकम, पपीन भोसले, स्वप्नील नाईकवाडी, संदीप इंगळे, विनोद निंबाळकर, खंडू राऊत, वैभव हंचाटे, प्रसाद मुंडे, प्रीतम मुंडे, गणेश एडके, रोहित मस्के, सुनील पंगुडवाले, रोहित देशमुख, सुरज वडवले, योगेश कुकडे, शुभम बनसोडे, विश्वा पेठे, मुकेश सूळ ई.उपस्थित होते.

 समूहनृत्य खुला गट प्रथम पारितोषिक 31000 आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब (विधानसभा सदस्य महाराष्ट्र):- शुभम डान्स ग्रुप लातूर, द्वितीय पारितोषिक 21000 विशाल पाटील मराठी माणुस व युवा आधार प्रतिष्ठान ,स्वजनहित सामाजिक बहुउद्देशीय  संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने :- संस्कृती ग्रुप बीड, तृतीय पारितोषिक 11000 प्रमोद पाटील (सरपंच वडगाव):- टीडीएस डान्स ग्रुप पंढरपूर,  उत्तेजनार्थ पारितोषिक 5000 योगेश कुकडे (युवा उद्योजक):- साईराज ग्रुप.

 लावणी खुला गट- प्रथम पारितोषिक 11000 नेताजी आबा पाटील (माजी जिल्हा परिषद अध्यक्ष) :-सानिका भागवत सातारा, द्वितीय पारितोषिक 7000 ओंकार शेरकर (सिद्धाई मंगल कार्यालय):- प्रीती मोहिते मुंबई, तृतीय पारितोषिक 5000 गणेश पवार (संगम हॉटेल) :- अनामिका आहीरे बीड, उत्तेजनार्थ पारितोषिक 3000 अमोल पेठे (पेठे फुटमॉल):- प्रिया  मासकर मुंबई

   सोलून नृत्य मोठा गट- प्रथम पारितोषिक 7000 बालाजी जाधव (बी जे कन्स्ट्रक्शन):- सानिका भागवत सातारा व अभय जोगदंड बीड, द्वितीय पारितोषिक 5000 किरण आडसुळे (आई ऑप्टिकल्स):-ऋषिकेश राठोड लातूर,  तृतीय पारितोषिक 3000 सुरज वडवले (युवा उद्योजक):- रोहित गुजरात, उत्तेजनार्थ पारितोषिक 2000 प्रशांत भोसले (दूध व्यवसाय):- सोनू कदम पंढरपूर

   सोलो वैयक्तिक लहान गट- प्रथम पारितोषिक 5000 ऐश्वर्या (ऐप):- रिक्त समानता कोलकत्ता, द्वितीय पारितोषिक 3000 महेश खडके (युवा उद्योजक):- इशिता बरवड पुणे,  तृतीय पारितोषिक 2000 हिम्मत भोसले (चिंचबन   हॉटेल):- हिंदवी चौरे वाशी, उत्तेजनार्थ पारितोषिक 1000 सागर मिसळ (जगदंबा हार्डवेअर):- मानवी पतंगे आंबेजोगाई. उत्कृष्ट लावणी बालकलाकार वयोगट 6 ते 15 3000 पारितोषिक जनाई फाउंडेशन :- किंजल चव्हाण आंबेजोगाई  या स्पर्धेसाठी सहभाग नोंदणी लहान गट सोलो डान्स 12, मोठा गट सोलो डान्स 13, लावणी 18, खुलागट समूह डान्स 9 व 250 पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला.

 या कार्यक्रमासाठी सहकार्य स्टॅंडर्ड बिर्याणी (पृथ्वीराज गायकवाड), वैष्णवी मोबाईल शॉपी (विशाल वैद्य), आकाश टॅटूज (आकाश भोसले), गणेश डोर अँड हार्डवेअर (गणेश लोहार), श्रीनाथ मोटार रिवायडींग वर्क्स (श्रीनाथ पडवळ), रॉयल मेंस हब (विश्वा पेठे), शेतकरी मीन्स (अभिजीत भोजगुडे), अक्की पान शॉप (आकाश जाधव), बालाजी मोबाईल (अमोल गोडगिरे), ए जे सेलिब्रेशन केक (अमर जिग्रे), रोहन झेरॉक्स (गणेश वाघे), तुळजाभवानी टायपिंग अँड शॉर्टहेड इन्स्टिट्यूट (अ‍ॅड.योगेश सोनेपाटील)

 या कार्यक्रमांतर्गत केवळ धाराशिव जिल्ह्यातील नव्हे तर अनेक राज्यातील स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या विविध गटामधील सहभागी स्पर्धक होते. त्यांनी आपल्या नृत्यांनी अस्थितांची मने जिंकली. याचबरोबर लावणीच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा विशेष प्रतिसाद पाहण्यास मिळाला. आता या नव्या 'धाराशिव महोत्सवामध्ये' दरवर्षी धाराशिवकरांना असाच नृत्याचा नजाराना मिळणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले प्रगती शेरखाने आणि सारंग जोशी यांनी. या कार्यक्रमाचे परीक्षक चेनी पंचरिया,शशी माने, विशाल टोले,सुहास झेंडे. या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये धनराज नवले ,नेहा काळे, सुरेश चिलवंत, रोहित भोसले, विश्वनाथ काळे सलमान शेख, नवनाथ सोलंकर यांनी विशेष सहभाग नोंदविला तसेच रसिक प्रेक्षकांनी हि या महोत्सवाला भरभरून प्रतिसाद दिला.


 
Top