कळंब  प्रतिनिधी-

  दक्षिण मुखी हनुमान मंदिर भजनी मंडळ कळंब यांच्या वतीने दिनांक 9 मार्च( फाल्गुन द्वितीया )रोजी दक्षिण मुखी हनुमान मंदिर कसबा कळंब येथे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमन बीज निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यानिमित्त कार्यक्रमात संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व  तसेच  गाथाभजन गायन करण्यात आले.

 याप्रसंगी भजनी मंडळाचे चत्रभुज(आप्पा) चोंदे ,खुळे गुरुजी , बब्रुवान कोळपे, संजय मुंडे, सुभाष फाटक, नागनाथ शेंडगे ,काका चोंदे ,विलास मिटकरी, परिमाळा घुले ,मैनाबाई माळी, नंदाबाई पांचाळ किसन खामकर यांनी भजन गायन केले याप्रसंगी तानाजी कदम यांच्या वतीने खीर प्रसाद वाटप करण्यात आला.


 
Top