कळंब  प्रतिनिधी-

   महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र कळंब च्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे दिनांक 10 मार्च रोजी आयोजन करण्यात आले यात उल्लेखनीय व कर्तत्वान कामगार व कामगार कुटुंबीय महिलांचा सत्कार कार्यक्रम सोहळा कामगार कल्याण केंद्र कळंब येथे ज्योतीताई सपाटे (बालविवाह प्रतिबंध टास्क फोर्स सदस्य व अध्यक्ष महिला पोलीस दक्षता समिती कळंब ) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात संपन्न झाला.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून  कीर्तनकार ह. भ. प .सुनितादेवी अडसूळ जिल्हाध्यक्ष वारकरी साहित्य .परिषद धाराशिव, मनीषा मोदी केंद्रप्रमुख कामगार कल्याण केंद्र कळंब यांची उपस्थिती होती याप्रसंगी उल्लेखनीय व कर्तुत्वान कामगार व कामगार कुटुंबीय महिला   पुष्पा फुलचंद इंगळे (महावितरण कार्यालय कळंब)   जयश्री रावण टेकाळे (कॅशियर उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा कळंब) श्रीमती आरती संगवे (नॅचरल शुगर साखर कारखाना  रांजणी ) राजकन्या गवळी  (बस वाहक कळंब बस आगार) अंजुम शेर अली बागवान (कामगार कुटुंबीय व सामाजिक कार्यकर्त्या) यांचा शाल ,मानचिन्ह, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली यानंतर प्रमुख पाहुणे कीर्तनकार, ह. भ. प. सुनीता देवी अडसूळ यांनी आपल्या भाषणात सत्कार झालेल्या महिला आपली दैनंदिन नोकरी  करून सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभागी होत आहेत याचा उल्लेख करून महिलांनी सामाजिक उपक्रमात पुढे येऊन सहभाग नोंदवावा असे सांगून भारतीय संस्कृती महिला पूजनीय असल्याचे सांगितले महिला जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घेऊन समर्थपणे सांभाळत आहेत याची उदाहरणे दिली तर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्योतीताई सपाटे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रमाता जिजाऊ ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी यांच्यामुळे महिला सुरक्षित आहे व आज त्या प्रत्येक क्षेत्रात सहभागी होऊन यशस्वीरित्या कारभार संभाळत आहे कार्यालयात व विविध क्षेत्रात पुढे होऊन काम करीत असून त्यांना कुटुंबातून व समाजातून प्रोत्साहन मिळायला हवे असे सांगितले व त्यांचे अधिकार व सुरक्षा याविषयी आपले विचार व्यक्त केले ,माधव सिंग राजपूत यांनी आपल्या मार्गदर्शनात  महिलांनी  व अंधश्रद्धा, रूढी परंपरेच्या जोखडातून बाहेर पडायला पाहिजे यासाठी समाज सुधारकांनी कार्य केल्याचे सांगून महिला अधिकारासाठी झालेला संघर्ष याविषयी आपले विचार व्यक्त केले  सत्कार ला उत्तर देताना सत्कारमूर्ती राजकन्या गवळी यांनी आपल्या मनोगतात महिलांनी आपल्या दैनंदिन कामा बरोबर आरोग्याकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले व  दैनंदिन योग, प्राणायाम करावा यासाठी आपण दहिफळ, येरमाळा येथे स्वतः योग प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहे असे सांगितले. या कार्यक्रमात सत्कारित महिलांनी आपले मनोगते व्यक्त केली.

 कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष ह भ प महादेव महाराज अडसूळ, महाराष्ट्र महाराष्ट्र गुणवंत कामगार असोसिएशनचे सचिव अच्युतराव माने, कामगार गुलाब बागवान व अमर भगरे सुरक्षारक्षक नॅशनल शुगर राजनी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मंजुषा पवार यांनी आभार केंद्रप्रमुख मनीषा मोदी यांनी मानले ,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल दिनेश गिरी ,अनुजा कुलकर्णी, यशोदा शिंपले, श्रीमती घाडगे यांनी परिश्रम घेतले.


 
Top