धाराशिव / प्रतिनिधी-
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मालाविषयी गुन्हे उघडकीस आणण्याचे अनुषंगाने कळंब उपविभागात पेट्रोलिंग दरम्यान मनुष्यबळ पाटी येथे गेलो असता गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पोलीस ठाणे शिराढोण गु.र.नं. 111/2022 कलम 394, 324, 323, 504, 34 भादवी मधील आरेपी नामे- भेंड्या ऊर्फ राजा तानाजी काळे हा मोहा येथे आलेला आहे. अशी माहिती मिळाल्यावरुन लागलीच मोहा येथे जावून नमूद इसमाचा शोध घेतला असता मिळून आला. त्यास विश्वासात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता त्यांने त्याचे नाव- भेंड्या ऊर्फ राजा तानाजी काळे, वय 26 वर्षे, असे सागिंतले. व त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सागिंतले की, त्याने व त्याचा साथीदार लल्या ऊर्फ अनिल बादल शिंदे रा. मोहा असे दोघांनी मिळून मंगरुळ रोडवर जाणाऱ्या एका महिलेचे सुवर्ण दागिणे घेवून पळून गेले होते. त्यानंतर त्या दोघंनी सदरचे सुवर्ण दागिणे विकून पैसे वाटून घेतले. त्याच्या कडून पथकाने पाच हजार रोख रक्कम हस्तगत करुन पुढील कार्यवाहिस्तव त्यास चोरीच्या मालासह शिराढोण पोलीसांच्या ताब्यात दिले. तसेच पोलीस ठाणे येरमाळा गु.र.नं.64/2021 कलम 394, 34, तसेच पोलीस ठाणे ढोकी गुरनं 204/2022 कलम 461, 380. असे त्यांनी वरील नमुद तीनही गुन्हे केल्याची कबुली दिली. असून त्याचा साथीदार इतर गुन्हयात लल्या ऊर्फ अनिल बादल शिंदे रा. मोहा हार्सुल कारागृह औरगांबाद येथे शिक्षा भोगत आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. चे पोनि यशवंत जाधव, सपोनि निंलगेकर, सफौ- काझी पोलीस हावलदार- औताडे, काझी, पठाण, मपोना- टेळे यांच्या पथकाने केली आहे.